योगाभ्यास आरोग्याच्या सर्व समस्यांसाठी उपयुक्त आहे : प्राचार्य सुनील शिंदे
वेब टीम नगर : योगाचा दररोजचा सराव आरोग्य आणि मानसशास्त्राशी संबंधित सर्व समस्यासाठी खूप उपयुक्त आहे. प्रत्येकाने सकाळी थोडा वेळ योगाभ्यासासाठी दयावा असे आवाहन प्राचार्य सुनील शिंदे, शासकीय औद्योगिक संस्था, अहमदनगर यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, अहमदनगर व राष्ट्रीय सेवा योजना, औदयोगिक प्रशिक्षण संस्था आणि योग विदया धाम, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 मे 2022 रोजी सकाळी 08 वाजता शासकीय औदयोगिक संस्था, अहमदनगर येथे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित सामान्य योग प्रोटोकॉल योग उत्सव 2022 विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी सुनील शिंदे बोलत होते.
विशेष कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली. प्राचार्य सुनील शिंदे, हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर, श्रीमती संगिता पवार, श्रीमती मीना देशपाई आणि योग विदया धामच्या कुम ऐश्वर्या लोढा राष्ट्रीय समाज सेवा प्रभारी श्रीपाद कुलकर्णी, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे प्रभारी फणीकुमार रॅलीच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
रॅलीची सांगता झाल्यानंतर योग विद्या धामच्या श्रीमती सगिता पवार, श्रीमती मीना देशपांडे आणि ऐश्वर्या लोदा दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व आणि विविध योगासनाचे माहिती देऊन सर्व जनतेने या मोहिमेचा लाभ घ्यावा असे सांगितले,
योग विद्या धामच्या प्रशिक्षकाने सहभागीसोबत काही योगासने आणि सराव केले. राष्ट्रीय समाजसेवेचे प्रभारी श्रीपाद कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक व कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
0 Comments