मुलाचे अपहरण करणारा आरोपी २४ तासात गजाआड

मुलाचे अपहरण करणारा आरोपी २४ तासात गजाआड 

वेब टीम नगर : भिंगार येथून मुलाचे अपहरण करणारा आरोपी २४ तासाचे आत पकडण्यात येऊन मुलास पुणे रेल्वे स्टेशनवरून सुखरुप आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. नागेश चंद्रभान भिंगारदिवे (वय ३५, रा. दरेवाडी, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. तर अपहरण झालेल्या मुलाचे अश्वीन परसराम क्षेत्रे असे नाव आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोसई सोपान गोरे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, दिनेश मोरे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, दिपक शिंदे, रवि सोनटक्के, पोकॉ रोहित येमुल व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.८ मे २०२२ रोजी मुलगा अश्वीन परसराम क्षेत्रे (वय ८) हा लहान मुलाबरोबर खेळत असतांना कोणीतरी अज्ञाताने अज्ञात मुलास पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे, या परसराम गुलाब क्षेत्रे (वय ३१, रा. केदारेवस्ती, शांतीनगर, सोलापुर रोड, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९८८/२०२२ भादविक ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

त्यानुसार पोनि श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणूक करुन अपहरण मुलाचा व अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पथकाने त्याप्रमाणे शोध घेत होते. या दरम्यान पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली की, मुलाचे अपहरण त्यांचे नात्यातील नागेश भिंगारदिवे याने केलेले असून तो स्टेटबँक चौकात आहे. तश्या सूचना पोनि श्री कटके यांनी पथकाला दिल्या. पथकाने आरोपींचा स्टेट बँक चौकात शोध घेत असतांना एकजण संशयीतरित्या फिरतांना दिसला त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस खाक्या दाखविताच त्याने त्याचे नाव नागेश चंद्रभान भिंगारदिवे, (वय ३५, रा. दरेवाडी, अहमदनगर) असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन अपहरत मुलगा आश्वीन परसराम क्षेत्रे यांचे अपहरणाबाबत चौकशी करता त्याने अपहरण केल्याची कबुली दिली. अपहरण केलेला मुलास दौंड रेल्वे स्टेशन येथे पुण्याकडे जाणारे रेल्वेमध्ये सोडून निघून आलो, अशी माहिती दिली. 

लागलीच विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पुणे रेल्वेस्टेशन येथे जाऊन अपहरत मुलाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आश्वीन परसराम क्षेत्रे (वय ८, रा. केदारेवस्ती, शांतीनगर, सोलापुररोड) असे असल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments