ईद निमित्त वाहतूक मार्गात बदल

ईद निमित्त वाहतूक मार्गात बदल 

वेब टीम नगर : मुस्लिम बांधवांची रमजान ईद सण असल्याने कोठला ईदगाह मैदान व हायवे रोड या ठिकाणी मुस्लीम बांधव नमाज अदा करत असतात त्या कारणा मुळे या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केला आहे.

चंद्र दर्शना नंतर सकाळी ७ ते १२ वाहतूक मार्गात बदल      

१) एस पी ओ चौक- न्यायनगर मार्गे बेलेश्वर चौक – किल्ला चौक जी पी ओ चौक- चांदणी चौक मार्गे

२)जी पी ओ चौक किल्ला चौक बेलेश्वर चौक न्याय नगर मार्गे एस पी ओ चौकाकडे

तसेच औरंगाबाद रोड कडून येणारी जड व इतर सर्व प्रकारची चारचाकी वाहने हे अ.नं. १ मार्गे

व पुणे रोडकडून येणारी जड व इतर सर्व प्रकारची वाहने अ. नं. २ मार्गे वळविणेबाबतचा कालावधीत

दिनांक ०३/०५/२०२२ रोजी सकाळी ०७:०० ते १२:०० वाजेपावेतो ( चंद्र दर्शनानुसार एक दिवस पुढे मागे )

जारी राहील.

Post a Comment

0 Comments