ॲड. शारदा लगड योगासन स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम

ॲड. शारदा लगड योगासन स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम 

वेब टीम नगर : अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या  ॲड.  सौ.  शारदा सुरेश लगड यांनी योगासन स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला.  बृहन महाराष्ट्र योग  परिषदे मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत .  ॲड . सौ शारदा लगड यांनी खुल्या गटात सुवर्णपदक मिळवले . अहमदनगर जिल्हा प्रसारक संस्था यांच्यामार्फत या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या . 

मेदींनीपूर पश्चिम बंगाल येथे दिनांक 26 ते 28 मे 2022 रोजी होणाऱ्या 25 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून त्यांची निवड झाली आहे.  त्यांच्या या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा योगप्रसार संस्थेचे सचिव श्री उमेश झोटिंग सर, तांत्रिक समिती अध्यक्ष कुमारी प्रणिता तरटे, आप्पा लाडाने, किरण बाल वे व सौ शिल्पा बालवे  यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कारही केला. 

 ॲड. सौ शारदा लगड गेल्या दहा वर्षापासून अहमदनगर येथील बी फिटनेस सेंटर येथे सौ शिल्पा बालवे ,किरनश्री किरण बालवे या योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाचा सराव करीत आहेत.   ॲड. शारदा लगड या महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष असून अहमदनगर येथील अंबिका महिला सहकारी बँकेच्या संचालिका आहेत ॲड . सौ शारदा लगड यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील ,आमदार संग्रामभैया जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व  माजी आमदार दादाभाऊ कळमकर आदींनी अभिनंदन केले आहे. 







Post a Comment

0 Comments