सरोश बाग झेंडीगेटमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट
वेब टीम नगर : सरोश बाग झेंडीगेट मध्ये गॅस सिलेंडर ब्लास्ट मोठं मोठे आगीचे लोळ एक वाहन पूर्णतः आगीत जळून खाक कोणतीही जीवित हानी झाली नाही. अहमदनगर शहरातील मनपाची मोठी पाण्याची टाकी याठिकाणी असून त्याखाली गॅस टाकीचा मोठा स्फोट झाला अहमदनगर मनपाच्या सरोश बागेत ही घटना घडली .आग लागल्यानंतर गाडीचे चारही टायर फुटले आणि आसपासचा परिसर हादरला एक मारुती व्हॅन गाडी या आगीत पूर्णतः जळाली अग्निशमन दलाने वेळीच घटना स्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.झेंडीगेट पोलीस चौकी शेजारी असलेल्या सरोश बागेत हि दुर्घटना घडली.
ब्लास्ट झालेल्या ठिकाणापासून फक्त ४०० मीटर अंतरावर सरोश पेट्रोल पंप आहे आणि समोरील भागात संपूर्ण रहिवाशी भाग आहे. आगीचे लोळ इतके मोठे होते कि दूरवरून दिसत होते. या ठिकाणी सरोश बागेची संरक्षक भिंत फ्लाय ओव्हरच्या कामासाठी काढण्यात आली असून येथे असलेल्या पाणी टाकीतून अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड ,सासरनगर,कोठी,रेल्वे स्टेटशन,आदी संपूर्ण अहमदनगरचा अर्धा भाग या टाकीतून पुढे पाणी पुरवठा होत असतो मात्र या टाकीची सुरक्षा रामभरोसे आहे . आज आगीची घटना घडली आणि यात फक्त एक गाडी पूर्णतः जळाली असली तरीही कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु मनपा प्रशासनाने आणि या बागेजवळ असलेले पोलीस प्रशासनाने पुढे अशी काही घटना घडू नये यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची अपेक्षा आहे.
0 Comments