आलमगीर येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

आलमगीर येथे दोन गटात तुंबळ हाणामारी 

परस्परांविरोधात फिर्याद दाखल 

वेब टीम नगर : आलमगीर येथील शहा कॉलनीमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हाणामारीत दोघे जखमी झाले आहेत. सुन्नी मस्जिद समोर ही घटना घडली. आफरीन मुसा शेख (वय 30 रा. आलमगीर) यांनी पहिली फिर्याद दिली आहे.

त्यानुसार वाहीद (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वाहीद याने फिर्यादीचा पती प्रतिक पांडुरंग आतकर याला गाडीवर बसवून नेले व सुन्नी मस्जिद समोर त्याच्या डोक्याचा बाजूला, हातावर, खांद्यावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसरी फिर्याद वाहिद जावेद काकर (रा. आलमगीर, भिंगार) यांनी दिली आहे. त्यानुसार आफरीन शेख व प्रतीक आतकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आफरीन हिने शिवीगाळ केल्याचे व तिचा पती प्रतिक याने वाहिद याला धारदार हत्याराने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments