महिलांशी आक्षेपार्ह कृत्य करणारा तरुण अटकेत
वेब टीम मंगळूर : सुजित शेट्टीविरोधात महिलांनी तक्रार दाखल केली. त्यात म्हटले आहे की, आरोपीने तिच्यासोबत ठोकटू येथील हुडा जुम्मा मशीद परिसरात आक्षेपार्ह कृत्य
कर्नाटकातील मंगळूरमध्ये दोन महिलांवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सुजित शेट्टी असे आरोपीचे नाव असून तो करकला येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचे वय 26 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले, महिलांनी सुजित शेट्टीविरोधात तक्रार दाखल केली. त्यात म्हटले आहे की, आरोपीने तिच्यासोबत ठोकटू येथील हुडा जुम्मा मशीद परिसरात आक्षेपार्ह कृत्य केले. पीडितेने सांगितले की, 28 एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ती मशिदीमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेली होती.
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मशिदीच्या आवारात महिलांसाठी असलेल्या खोलीत महिला नमाज अदा करत असताना सुजित शेट्टी याने बेकायदेशीरपणे खोलीत प्रवेश करून त्यांच्यासोबत हात ओढून आक्षेपार्ह कृत्य केले. महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपींवर कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
0 Comments