भाळवणी येथे स्व.दिलीप गांधी सभामंडपाचे (शनिदरबार) शनिवारी उदघाटन
वेब टीम भाळवणी : सिद्धेश्वर प्रतिष्ठान च्या वतीने दिनांक 30 रोजी सकाळी नऊ वाजता केंद्रीय मंत्री स्वर्गीय दिलीप गांधी सभामंडप( शनि दरबार) चा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सभामंडपाच्या उद्घाटन प्रसंगी रुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .यावेळी पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे प्रफुल्ल दिवान प्रकल्प संचालक रस्ता परिवहन आणि राजा मार्ग नवी दिल्ली, सुवेंद्र गांधी भाजपा युवा नेते, सुजीतराव झावरे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अहमदनगर, वसंतराव चेडे भाजपा तालुकाध्यक्ष, अश्विनीताई थोरात महिला जिल्हाध्यक्ष भाजपा पारनेर यांच्या शुभहस्ते तैलाभिषेक व सभामंडपाचे उद्घाटन होणार आहे. .
प्रमुख पाहुणे म्हणून माजी दूध संघाचे माजी चेअरमन उद्धवराव अमृते पाटील, अमरेश सहाय मुंबई ,श्री अशोकराव चेडे नगरसेवक पारनेर, वैशाली भलवी वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण पारनेर ,सागर मैड युवा भाजपा युवा नेते, श्री दत्ताभाऊ परभाणे भैरव भक्त मानस ज्योतिषी ,श्री बाळासाहेब पोटघन जिल्हाध्यक्ष नरेंद्र मोदी आर्मी ,श्री दादासाहेब बोठे जिल्हा कार्यालय प्रमुख भाजपा, हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत . सभामंडपाच्या उद्घाटनप्रसंगी ह. भ.प. बाबासाहेब महाराज दळवी, भाळवणी यांचे सकाळी दहा वाजता प्रवचन होणार आहे . यावेळी महाप्रसाद, खिचडी चे वाटपही होणार आहे . बाबासाहेब पोपटराव रोहोकले , भाऊसाहेब नागोजी चेमटे ,गोविंद तात्याबा कुंभकर्ण आणि नंदकुमार यांच्यावतीने होणार आहे. दत्ताभाऊ परभणे महाराज, डॉक्टर अभिजीत भोसले यांच्या वतीने हनुमान चालीसा चे वाटप केले जाणार आहे.
सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त ग्रामस्थ मंडळी भाळवणी व माळवाडी मंडळ श्री शनेश्वर प्रतिष्ठान च्या वतीने रमेश रोहोकले,अरुण रोहोकले एडवोकेट संदीप रोहोकले श्री जगदीश आंबेडकर श्री सुजित आंबेडकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे स्थळ श्री क्षेत्र शनेश्वर मंदिर माळवाडी तालुका पारनेर आहे.
0 Comments