बंदुकीच्या जोरावर दिरा समोरच वहिनीवर बलात्कार

बंदुकीच्या जोरावर दिरा समोरच वहिनीवर बलात्कार

वेब टीम भरतपूर : राजस्थानमध्ये पुन्हा एकदा एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. भरतपूर जिल्ह्यात दोन जणांनी दिरा समोरच बंदुकीच्या धाकावर त्याच्या वाहिनीवर सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या पतीने गावातील काही लोकांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहारी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने गावातील काही लोकांवर आपल्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पतीने सांगितले की, २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास माझा लहान भाऊ त्याच्या वाहिनी सोबत पेहारहून येत होता. दरम्यान, गावातील काही लोकांनी त्याला घाटमिकाच्या जंगलात पकडले. दिराने   हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला . मात्र त्यांनी त्याच्या डोक्यात बंदूक ठेवून गुन्हा करून पळ काढला.

घटनेनंतर वाहिनी  आपल्या दिरासोबत घरी पोहोचला आणि सगळा प्रकार भावाला सांगितला. त्यानंतर पतीने पत्नीवर सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.


Post a Comment

0 Comments