आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची १९५ वी जयंती भिंगार काँग्रेसतर्फे अभिवादन

आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची १९५ वी जयंती भिंगार काँग्रेसतर्फे अभिवादन

वेब टीम नगर : आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे १९५वी जयंती निमित्त भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे. भिंगार अर्बन बँकेच्या चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भंडारी यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ रमेश त्रिमुखे, प्रदेश सदस्य व भिंगार काँग्रेस कार्याध्यक्ष शामराव वाघस्कर, संजय झोडगे, अनिल परदेशी, ज्ञानदेव भिंगारदिवे आदी यावेळी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना श्री भंडारी म्हणाले ज्यावेळी समाजावर जुन्या अनिष्ट प्रथांचा मोठा प्रभाव होता त्यावेळी पुरोगामी विचारांचा पुरस्कार करत प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा मिळावी, त्याचे हक्क अबाधित राहावेत यासाठी महात्मा फुले व त्यांच्या पत्नीने धाडसाने कार्य केले. समाजात समानता आणणे हीच खरी या महात्म्याला श्रद्धांजली ठरेल. यावेळी    मार्गारेट जाधव, निजाम पठाण, जालिंदर आळकुटे, भूषण चव्हाण, अनिल वराडे, सागर चाबुकस्वार आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments