गुणरत्न सदावर्तेचा तुरुंगातला मुक्काम वाढला

गुणरत्न सदावर्तेचा तुरुंगातला मुक्काम वाढला 

वेब टीम मुंबई : जेष्ठनेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याला आंदोलकांना चिथावणी दिल्याबद्दल अटकेत असलेल्या ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पुन्हा २ दिवसांची वाढ करत त्यांना १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.गुणरत्न सादवर्तेना ११ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांकडुन करण्यात आली होती. पोलिसांचे वकील घरत यांनी न्यायालया समोर सदावर्तेच्या यापूर्वीच्या २ दिवसाच्या कोठडी काळातील तपासात झालेल्या प्रगतीची न्यायालयाला माहिती दिली. 

जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थाना समोर आंदोलन झाल्यानंतर ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना हल्ल्याचा कट केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान आज एस टी आंदोलकांकडून ९५,००० कर्मचाऱ्यांकडून ५५०रु. प्रत्येकी या प्रमाणे पैसे गोळा करण्यात आल्याचा आरोप न्यायालयात करण्यात आला. हि रक्कम १ कोटी ८० लाखांच्या घरात असून सदावर्तेच्या वकिलांनी पैसे घेतले मात्र मागितले नाहीत असा युक्तिवाद केला शिवाय या पैश्याचे अन्य वाटेकरीही असल्याचे पोलिसांचे वकील घरत यांनी युक्तिवाद करून ते वांतिकारी कोण याचा शोध घ्यायचा असून सदावर्तेच्या फोनच्या सीडीआर वरून पोलिसांना बऱ्याच गोष्टी मिळाल्या असून त्यांनी डिलीट केलेले फोन कॉल्स,मेसेजेस यांचा खुलासा होणे तसेच त्यातून मिळालेले नागपूर कनेक्शनचा शोध घ्यायचा असून त्यासाठी ११ दिवसाची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायाधीशांनी १३ ऐपत पर्यंत म्हणजेच २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

Post a Comment

0 Comments