शहर,उपनगरात श्रीराम नवमी उत्साहात

शहर,उपनगरात श्रीराम नवमी उत्साहात 

वेब टीम नगर : नगर शहर , सावेडी,केडगाव ,भिंगार व अन्य  उपनगरात रामनवमी उत्सव उत्साहात पारपडला आज सकाळपासूनच ठिकठिकाणी रामधून वाजवण्यात आली तर अनेक मंदिरांमध्ये रामनावणी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . अनेकठिकाणी दुपारी १२ वाजता पाळणा सजवून त्यामध्ये श्रीरामाची प्रतिमा ठेवून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील अनेक चौकात भगव्या पताका लावून व्यासपीठ सजवून त्यावर  प्रभू रामचंद्रांच्या  भव्य प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. 

सावेडी परिसरातील पावन नगर येथे राम नावानी उत्सवास पालखी सोहळ्याने सुरवात झाली .. आईसाहेब प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा शिल्पाताई दुसुंगे  पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले.  

शिलाविहार येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात श्रीराम नवमी निमित्त रामजन्म सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

     गुडीपाडव्यापासून दररोज भाविक दोन तास नामजपासाठी मंदिरात नित्यनियमाने येत होते. रविवारी दुपारी 12 वा. श्रीरामांचा जन्मोत्सवामध्ये पाळणा सजवून फुले उधळून मोठ्या उत्साहात उत्सव पार पडला.

     यावेळी ब्रह्मचैतन्य भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, यामध्ये तबलावादक  यश दळे, पेटीवादक दिलीप पुुंड यांना हभप किंबहुणे महाराज, दळवी महाराज, लोखंडे महाराज, पिसे महाराज आदिंनी गायनासाठी साथ दिली. मधुकर राऊत गुरुजी, सुंदरदास रिंगणे, महिला भजनी मंडळ सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments