भ्रमणध्वनी द्वारे चालणारे माध्यम

भ्रमणध्वनी द्वारे चालणारे माध्यम  

आजच्या आधुनिक त्याच्या काळामध्ये प्रत्येक व्यवस्थेमध्ये खूप मोठा बदल झालेला आपल्याला पाहण्यास मिळत आहे . भ्रमणध्वनीच्या माध्यमातून सुद्धा फार बदल झालेला दिसतो आहे.  साधारणता दोन दशकांच्या मागे  वर्तमानपत्रा  शिवाय देशातील घडामोडींची माहिती होत नव्हती, आणि दुसरे म्हणजे बातमी समजण्यासाठी एक दोन दिवस लागत असत.  परंतु भ्रमणध्वनीमुळे देशात कोणत्याही ठिकाणी काहीही घटना घडली तरी अवघ्या काही मिनिटात संपूर्ण देशात त्याची माहिती होते.  त्यातील एक नवीन प्रकारचे माध्यम बातमीसाठी व माहिती उपलब्धते  साठी निर्माण  झाले आहे.  त्यास 'वेबपोर्टल' असे म्हणतात . त्यामध्ये 'नगर टुडे,' 'सरकारनामा','रयत  समाचार', 'पारनेर दर्शन इत्यादी प्रकारचे वेबपोर्टल्स  आहेत . त्यापैकी 'नगर टुडे' चे संपादक  देवीप्रसाद अय्यंगार हे ३५ वर्ष  प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करीत होते.  परंतु मागील दोन वर्षापासून 'नगर टूडे' नावाचे पोर्टल चालवत आहेत. त्यांनी नारायण आव्हाड यांच्यासाठी 'नगर जिल्ह्याचे  अंतरंग'हे  सदर सुरू केले.  त्यासाठी त्यांनी लेखी द्यावे याविषयी एक सारखा लकडा लावून त्यांच्याकडून लेख घेण्यास सुरुवात केली. 

 एक-दीड वर्षे जवळ जवळ वीस पंचवीस लेख प्रसिद्ध  झाले.  पुढे दोन महिन्यापूर्वी या सदराचे नाव 'इतिहासाच्या पाऊल खुणा' असे  ठेवून सदर चालू आहे.  त्या सदराचे साधारणत सहा-सात लेख प्रसिद्ध  झालेले आहेत.  त्यामध्ये 'वारकरी संप्रदाय', 'तप्त दिव्य', 'पांडुरंग अवतार', 'मालोजी भोसले',' शहाजी भोसले', 'राजमाता जिजाबाई',' संभाजी महाराज',' चौथे छत्रपती शिवाजी महाराज',' मलिक अंबर ','अहमदनगरची निजामशाही',' महानुभावपंथ',' शिवाजी महाराज अष्टप्रधान मंडळ', 'भातवडी ची लढाई 'तहसील कोपरगाव येथील गोदातीर तटावरील राघेश्वर मंदिरा मध्ये पेशवेकालीन घडलेला 'तप्त दिव्य 'या वरील लेख तसेच तहसील श्रीगोंदा येथील सरस्वती नदीचा उगम व लक्ष्मीचे अवतरण त्यानंतर पांडुरंग शर्मा करावी पंढरपूर विठ्ठलाचे आगमनाचा लेख घोडेगाव वरून येणारी देवनदी व श्री गुंडा वरून येणारी सरस्वती नदी त्यांचा मौजे चोराचीवाडी या गावच्या पूर्वेला झालेला दोन्ही नद्यांचा संगम व पुढे चार-पाच किलोमीटर जाऊन सरस्वति नदीचा भीमा नदीमध्ये पेडगाव येथे संगम होतो यावरील लेख आणि अहमदनगर जिल्ह्याचे पौराणिक महत्त्व तसेच दिनांक 27 मार्च रोजी प्रसिद्ध झालेला  अहमदनगर जिल्ह्यात पवित्रता या विषयाचे लेख अशाच प्रकारचे अहमदनगर जिल्ह्याचे महत्व सांगणारे व इतिहास सांगणारी लेखमाला सुरू आहे.  या कार्या साठी ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. 

लेखक नारायण आव्हाड, अहमदनगर

 संदर्भ ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय लायब्ररी 


Post a Comment

0 Comments