क्षुल्लक वादावरून मित्राचा दगडाने ठेचून खून
वेब टीम नागपूर : क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात एका युवकाने मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना आज सकाळी आठ वाजता नागपूरमधील कळमन्यातील गोपालनगरात घडली. विक्रांत बंडगर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून गेल्या चोवीस तासांतील उपराजधानीतील हे दुसरे हत्याकांड आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत बंडगर हा मूळचा हैदराबादचा असून त्याला विवाहित बहिण आहे. आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तो कामाच्या शोधात नागपुरात आला. तो मिळेल ते काम करीत होता. पदपाथ किंवा मिळेल तेथे राहत होता. त्याची गणेश भेंडेकर (२६, आदिवाशी प्रकाशनगर, चिखली लेआऊट) याच्याशी मैत्री होती. दोघेही सोबत राहत होते. सोमवारी दोघेही डिप्टी सिग्नल परिसरात सोबतच फिरत होते. दोघांमध्ये क्षुल्लक वाद झाला. गणेशने दगडाने विक्रांतवर हल्ला केला. तो खाली कोसळताच चाकूने भोसकले. त्यामुळे विक्रांतचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.
0 Comments