अहमदनगर केंद्रातून 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे नाटक सर्वोत्कृष्ट
वेब टीम नगर : ६०व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून वात्सल्य प्रतिष्ठान अहमदनगर या संस्थेच्या 'ज्याचा त्याचा प्रश्न' या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे ज्याचा त्याचा प्रश्न या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे अहमद. नगर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे
रंगकर्मी प्रतिष्ठान अहमदनगर या संस्थेच्या 'महापात्रा' या नाटकास द्वितीय ,तर तृतीय पारितोषिक संकल्पना फाउंडेशन कोपरगाव या संस्थेच्या 'षड्यंत्र' या नाटकासाठी प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक सतीश लोटके नाटक 'ज्याचा त्याचा प्रश्न' द्वितीय पारितोषिक शैलेश देशमुख नाटक 'महापात्रा' प्रकाशयोजना प्रथम पारितोषिक गणेश लिमकर नाटक 'महापात्रा' द्वितीय पारितोषिक मुन्ना सय्यद नाटक 'ज्याचा त्याचा प्रश्न 'नेपथ्य प्रथम पारितोषिक दीपकओहोळ नाटक "नागपद्म' ,द्वितीय पारितोषिक नाना मोरे नाटक 'महापात्रा' रंगभूषा प्रथम पारितोषिक युक्ता ठुबे नाटक 'तुक्याची आवली' द्वितीय पारितोषिक प्रांजळ सपकाळ नाटक 'षड्यंत्र 'उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक दीपक शर्मा नाटक 'ज्याचा त्याचा प्रश्न' व अश्विनी अंचवले नाटक 'तुक्याची आवली 'अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र श्रुती देशमुख नाटक 'महापात्रा' रेवती शिंदे नाटक 'ज्याचा त्याचा प्रश्न' श्रद्धा तिरमरवें नाटक 'षडयंत्र' आरती अकोलकर नाटक 'नागपद्म' मयूर तिरमरवे नाटक ' षडयंत्र 'तेजस अतितकार नाटक "ज्याचा त्याचा प्रश्न' देवीप्रसाद सोहोनी नाटक 'महापात्रा' अथर्व धर्माधिकारी नाटक 'कोणीतरी येणार ग'.
दिनांक 21 फेब्रुवारी ते ५ मार्च२०२२ या कालावधीत माऊली सांस्कृतिक सभागृह अहमदनगर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण अकरा नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सर्व श्री सुरेश बारसे, अरुण शेलार आणि अनिल पालकर यांनी काम पाहिले . सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments