कुटुंबाचे आधारवड असलेल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान

कुटुंबाचे आधारवड असलेल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान

ज्येष्ठ महिला कुटुंबासह समाजव्यवस्थेचा कणा : प्रा. माणिक विधाते

वेब टीम  नगर : कुटुंबाचे आधारवड असलेल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान करुन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी ज्येष्ठ महिलांना गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, नाथाजी राऊत, प्राचार्य कैलास मोहिते, रमेश वराडे, दिपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, सुभाष होडगे, अर्जुन बेरड, सिध्दार्थ आढाव, मारुती पवार, विशाल बेलपवार, योगेश करांडे, राधेलाल नकवाल, सर्वेश सपकाळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपट नगरे, शशीकांत बोरुडे, अनंत सदनापूर, भगवान दळवी, दिलीप बोंदर्डे, अशोक पराते, सुंदर पाटील, अशोक पवार आदींसह ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, ज्येष्ठ महिला या कुटुंबासह समाजव्यवस्थेचा कणा आहे. पुरुषाला योग्य दिशा देण्याचे कार्य ही आई, पत्नी, बहिणच्या रुपाने महिला करत असते. ज्येष्ठ महिलांना कुटुंबात आदराचे स्थान देऊन त्यांचे मार्गदर्शन भावी पिढीसाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  संजय सपकाळ म्हणाले की, ज्येष्ठ महिला कुंटुंबाचे आधारवड व दिशादर्शक असतात. या महिलांमुळेच संस्कार व संस्कृतीचे टिकून आहे. त्यांच्या मार्गदर्शनानेच विकासात्मक वाटचाल चालू असते. महिला दिनी त्यांचा मान सन्मान व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments