कराडकर यांच्यावर फौजदार कारवाई व्हावी : ॲड. सौ शारदाताई लगड

कराडकर यांच्यावर फौजदार कारवाई व्हावी : ॲड. सौ शारदाताई लगड  

वेब टीम नगर : ज्येष्ठ ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांनी राजकारण्यांची मुले दारूच्या आहारी गेलीत. असं म्हणून पंकजाताई मुंडे व खा.सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख करून महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींचा अपमान केला असल्याने त्यांनी केवळ त्याबाबत माफी मागून उपयोग नाही,तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा ॲड.सौ शारदाताई लगड यांनी थेट राज्याचे गृहमंत्री माननीय ना.दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे.  

त्यात त्यांनी म्हटले आहे की, कराडकर महाराज आपण ज्येष्ठ कीर्तनकार आहात आपल्या तोंडी हरिनाम सोडून असे गलिच्छ वक्तव्य शोभत नाही खोटं बोलायचं, नंतर माफी मागायची असे चालत नाही. थोडक्यात एखाद्या व्यक्तीने खून करायचा आणि म्हणायचं माफ करा मला "माझ्याकडून चुकून खून करण्यात" आला अशी माफी मागून न्यायालय त्यांना निर्दोष सोडत नसतं त्यांना शिक्षा असू देत असतात हे ध्यानात ठेवावे, हभप बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचा आम्ही महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनी जाहीर निषेध व्यक्त करतो.  

त्यांनी फौजदारी गुन्हा केलेला आहे.तरी कराडकर यांचे विरुद्ध चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल फौजदारी कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतो अशी मागणी ॲड.शारदाताई लगड यांनी राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. 

Post a Comment

0 Comments