4,300 रशियन सैनिक मारले गेले; युक्रेनचा दावा

4,300 रशियन सैनिक मारले गेले; युक्रेनचा दावा

146 रणगाडे, 27 लढाऊ विमाने आणि 26 हेलिकॉप्टरही नष्ट करण्यात आले

वेब टीम कीव : रशियाचा युक्रेनवर हल्ला सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, युक्रेनने दावा केला आहे की, या लढाईत आतापर्यंत सुमारे 4,300 रशियन सैनिक मारले गेले आहेत. तसेच सुमारे 146 रणगाडे, 27 विमाने आणि 26 हेलिकॉप्टर नष्ट करण्यात आले आहेत. यापूर्वी रशियाने युक्रेनला बेलारूसमध्ये वाटाघाटी करण्याची ऑफर दिली होती. युक्रेनने ही ऑफर नाकारली आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले- आम्ही रशियाशी चर्चेसाठी तयार आहोत, पण बेलारूसमध्ये नाही.

"अर्थात आम्हाला शांतता हवी आहे, आम्हाला भेटायचे आहे, आम्हाला युद्ध संपवायचे आहे," झेलेन्स्की म्हणाले. आम्ही वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापेस्ट, इस्तंबूल, बाकू येथे वाटाघाटी करण्याची ऑफर दिली आहे. दरम्यान, रशियन सैन्याने युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किवमध्ये प्रवेश केला आहे. त्याच वेळी, कीवच्या बाहेर, युक्रेनियन सैन्याने रशियाच्या बाजूने लढत असलेल्या चेचन स्पेशल फोर्सच्या सर्वोच्च जनरलला ठार मारले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जगभरातील लोकांना रशियाविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

रशियाने युक्रेनमधील नोव्हा काखोव्का ताब्यात घेतला. त्याने दक्षिणेकडील युक्रेनियन शहरे खेरसन आणि बर्द्यान्स्क यांनाही वेढले.

चेरनोबिलवर रशियन कब्जा केल्यानंतर, अणु किरणोत्सर्गाचा धोका 20 पटीने वाढला आहे. या भागात रशियन सैन्याच्या हालचालीमुळे सर्वत्र किरणोत्सर्गी धूळ पसरली आहे.

उत्तर कोरियाने युक्रेन युद्धासाठी अमेरिकेला जबाबदार ठरवत म्हटले की, अमेरिका पूर्वी महासत्ता होती ते दिवस गेले.फेसबुकची मूळ कंपनी मेटाने सर्व रशियन मीडिया आऊटलेट्सना फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिरात करण्यावर बंदी घातली आहे. यूट्यूबने अनेक रशियन मीडिया चॅनेलवरही बंदी घातली आहे.

रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 198 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला असून त्यात 33 मुलांचा समावेश आहे. याशिवाय 1,115 लोक जखमी झाले आहेत. यूएनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत 1.50 लाखांहून अधिक युक्रेनियन निर्वासित पोलंड, मोल्दोव्हा आणि रोमानियामध्ये पोहोचले आहेत.

युक्रेनमधील युद्धामुळे उद्भवलेल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्येवर मात करण्यासाठी इलॉन मस्क स्टारलिंक सॅटेलाइट ब्रॉडबँडवरून इंटरनेट पुरवणार आहेत. युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी सोशल मीडियावर मस्कची मदत मागितली, त्यानंतर त्यांनी युक्रेनमध्ये स्टारलिंक उपग्रह तैनात करण्याबद्दल बोलले.

युक्रेनचे 800 लष्करी तळ नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहेयुक्रेनवरील हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी, रशियाने दावा केला की त्यांनी 800 युक्रेनचे लष्करी तळ नष्ट केले. यामध्ये 14 लष्करी एअरफील्ड, 19 कमांड पोस्ट, 24 S-300 विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आणि 48 रडार स्टेशनचा समावेश आहे. याशिवाय युक्रेनच्या नौदलाच्या 8 बोटीही उद्ध्वस्त झाल्या.

Post a Comment

0 Comments