हनीट्रॅप मध्ये अडकवून दोन लाख रुपये उकळले
वेब टीम श्रीगोंदा : एका मागून एक उघडकीस येणार्या हनी ट्रॅपच्या प्रकारणांनी अहमदनगर जिल्हा ढवळून निघाला आहे. काही महिन्यापुर्वीच जिल्ह्यात हे प्रकरण चर्चेचा विषय बनले होते . यात आता श्रीगोंदा तालुकाही मागे राहिला नाही श्रीगोंदा तालुक्यातील एका सरकारी अधिकाऱ्यावर हनीट्रॅप चे जाळे टाकून एका महिलेने लाखो रुपये उकळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र सदर प्रकरण दडपण्यासाठी त्या सरकारी बाबूने जोरदार प्रयत्न केले मात्र त्यात तो अधिकारी अपयशी झाला लाखो रुपये देऊनही प्रकरणाची अखेर चर्चा झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
हनीट्रॅप सारखा प्रकार श्रीगोंदा शहरात घडल्याने याप्रकरणाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. . याबाबत सखोल माहिती घेतली असता श्रीगोंदा शहरातील एका विवाहित महिलेची आपल्या कामानिमित्त सरकारी कार्यालयात जात असताना तोंडओळख झाली. काही दिवसांनी त्या महिलेने संबंधित सरकारी बाबुला सोशल मीडियावर मैत्रीसाठी विनंती पाठवली महिलेची मैत्रीसाठी आलेली विनंती पाहून सरकारी अधिकाऱ्याने विनंती स्वीकारली आणि तेथूनच सुरु झाले प्रेम प्रकरण.
या प्रेम प्रकरणात विवाहित महिला आणि सरकारी अधिकारी यांच्या भेटी गाठी होऊ लागल्या. एक दिवशी असेच त्यांनी हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरविले आणि शहरातील एका हॉटेलमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी एक खोली भाड्याने घेतली त्यावेळी दोघांच्या मर्जीने त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यावेळी त्या महिलेने त्यांचे चित्रफीत व अश्लिल फोटो काढले नंतर असेच काही दिवस उलटल्यानंतर त्या विवाहित महिलेने सरकारी बाबुला फोन केला आणि सांगितले मी सांगते तेवढे पैसे दे नाहीतर तुझे अश्लिल फोटो व चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी दिली. सुरवातीला ५ लाख रुपयाची मागणी केली मात्र इतके पैसे देण्यास अधिकारी तयार होत नसल्याने अखेर ते प्रकरण दोन लाख रुपयात मिटले. मात्र ‘हनीट्रॅप’मध्ये गुंतवून सरकारी बाबुला लुटल्याची घटना उघडकीला आल्याने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. अश्या अनेक गुन्हेगारी टोळ्या श्रीगोंदा तालुक्यात कार्यरत आहेत. अश्या टोळीकडून वर्षभर होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीची ही घटना बहुचर्चित ठरली आहे. याबाबत संबंधित सरकारी अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांनी धाडसाने पुढे येऊन समाजकंटकाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी केले आहे.
अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसुली करण्यात येत आहे. या काळात दोन लाखापेक्षा अधिक रक्कम उकळल्याची चर्चा आहे. एकेकाळी दुचाकीवरून फिरणारे सराईत डोळ्यावर महागडा गॉगल लावून मोठ्या दिमाखात चारचाकी मोटारीतून वावरत आहेत. अल्पावधीत कामधंदा न करता पैसा आला कोठून, हा श्रीगोंदा शहरात चर्चेचा विषय आहे.
0 Comments