११ वीतील विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार, सहा जण अटकेत
आरोपींवर कठोर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी
वेब टीम नर्मदा : गुजरातमध्ये बलात्काराची एक धक्कादायक घटना घडली आहे. नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा शहरात इयत्ता ११ वीतील विद्यार्थिनीवर सहा किशोरवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहाही आरोपींना अटक केली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींनी पीडितेला डेडियापाडा एसटी डेपो परिसरातून शाळेत नेले आणि शाळेच्या आवारात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
आरोपींनी पीडितेला ३१ जानेवारीला नेलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवसपर्यंत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेनं तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणातील सर्व सहाही आरोपींना आतापर्यंत अटक केली गेली आहे.
0 Comments