“निवडणुकीच्या तयारीला लागा”
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वमीवर मनसेची महत्वपूर्ण बैठक
वेब टीम मुंबई : आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वपूर्ण बैठक मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी नेते, पदाधिकरी आणि कार्यकर्तयांना महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच, मनसैनिकांनी युतीच्या चर्चेत पडू नये, असं आवाहन देखी राज ठाकरे यांनी या बैठकीत केल्याचं समोर आलं आहे.
ही बैठक संपल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “निवडणुकीचं, सोशल मीडियाचं, निवडणुकीच्या दिवशीचं व्यवस्थापन कसं करायचं? या संदर्भातील समित्या स्थापन करून, तसेच काही लोकाशी बोलून आणि तिथल्या इच्छुक उमेदवारांशी बोलून त्यांचे मुद्दे काढणे. उमेदवारांची यादी ठरवणे. या सगळ्यांबाबतची चर्चा आजच्या बैठकीत झाली. आता सध्या तरी राज ठाकरे यांनी आम्हाला स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत.”
तसेच, “ वॉर्ड रचना बदलली तरी लोकाची नाराजी नाही ना बदलू शकत. मरठी माणसं, हिंदुत्ववादी माणसं शिवेसेनेबरोबर आहेत का? मग शिवसेनेला अनुकुल असे कुठले वॉर्ड? मुळात असं काही नसतं, लोकाची मानसिकता आता शिवसेनेबरोबर नाही. या संपूर्ण करोनाच्या कालावधीत ज्या प्रकारचा त्रास लोकाना झालेला आहे. किती वॉर्ड रचना बदलली तरी आजचं मरण उद्यावर ढकलू शकतील पण मरण अटळ आहे हे निश्चत. असंही संदीप देशपांडे यांनी यावेळी शिवसेनेवर टीका करताना बोलून दाखवलं. ”
याचबरोबर, “ सध्या सगळ्या जागांवर उमेदवारांची चाचपणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिली आहेत. तसेच, मुंबईचं महत्व कितीही कमी करण्याचा प्रयत्न कोणीही केला, गेल्या दीडशे वर्षात हे कोणालाही जमलेलं नाही आणि यापुढेही जमणार नाही. ” असंही यावेळी संदीप देशपांडे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं.
0 Comments