लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल
वेब टीम पुणे : तीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्न करण्यास नकार दिल्याने सोबत काम करणाऱ्या आरोपीविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून रितेशकुमार राजेंद्र लाड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे कल्याणीनगर परिसरातील एका आस्थापनेत काम करतात. तेथे त्यांची ओळख झाल्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि वाघोलीतील एका फ्लॅटवर घेऊन जात तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.त्यानंतर मात्र आरोपीने फिर्यादी सोबत लग्न करण्यास टाळाटाळ करून तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. सुरुवातीला हा गुन्हा मध्यप्रदेशातील खंडवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. तिथून तो लोणीकंद पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
0 Comments