एसटीचे 21 हजार ३५ कर्मचारी कामावर रुजू

एसटीचे 21 हजार ३५ कर्मचारी कामावर रुजू 

निलंबन रद्द करण्याची कारवाई  सुरू 

वेब टीम नगर : महाराष्ट्र शासनात विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यामुळे एसटीची चाके ठप्प झाली आहे.

यामुळे प्रवाश्याना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार 21 हजाराहून अधिक कर्मचारी कामावर परतले आहे. अधिक माहिती नुसार राज्यात आतापर्यंत सुमारे २१ हजार ३५ कर्मचारी कामावर रुजू झाले असून सोमवारपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता एसटी महामंडळाने व्यक्त केली.

दरम्यान, कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याची प्रक्रिया महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. कर्तव्यावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.शिवाय निलंबित कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे लेखी निवेदन किंवा प्रतिज्ञापत्र घेऊ नये, परतलेल्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पाठवण्यात यावे, या सूचना राज्यभरातील विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे.

राज्यभरात रविवारी २,११९ बसगाड्या रस्त्यांवर धावल्या आहे, तर १२२ आगारांचे कामकाज सुरू झाले. उच्च न्यायालयाने संपकऱ्यांचा मागणीवरून राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन केली आहे.या समितीकडून सर्व संघटनांची, संपकऱ्यांची आणि राज्य सरकारचे मत घेऊन हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे.त्यानंतर  हा अहवाल न्यायालयात दाखल केला जाणार असून त्यामध्ये केवळ विलीनीकरण शक्य की अशक्य यावर टिपण्णी केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments