अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी पसार, पोलीस शोधात
वेब टीम नगर : ओढ्याच्या शेजारी शेळ्या चारत असलेल्या अल्पवयीन मुलीला ओढ्यात घेवुन जावुन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, ९ डिसेंबरला नगर तालुक्यात घडली.झालेला प्रकार पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने शुक्रवार, १० डिसेंबरला रात्री पावणे बारा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी अत्याचार करणारा मस्ताराम (पुर्ण नाव माहीत नाही, रा. साईबन जवळ, निंबळक शिवार ता. अहमदनगर) याच्याविरूद्ध भादंवि कलम 376(2), (आय), बाल लैगिक अत्याचार अधि.2012चे कलम 4,5,(एम)/6 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.10 वर्षाची अल्पवयीन मुलगी गुरूवारी नगर तालुक्यातील एका गावातील ओढ्याच्या शेजारी शेळ्या चारत होती. दुपारच्या वेळी मस्तारामने त्या अल्पवयीन मुलीला ओढ्यात घेवुन जावुन तिच्यासोबत अत्याचार केला.
यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईला झालेल्या प्रकार सांगितला. आईने शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून मस्ताराम विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.आरोपी मस्ताराम पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहेत.
0 Comments