'त्या' १२ प्रवाशांच्या कोरोना चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा

'त्या' १२ प्रवाशांच्या कोरोना चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा 

वेब टीम नगर :  काेराेनाच्या नवा ओमायक्राॅन व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली आहे.  केंद्र व राज्य सरकार अलर्ट झाले असून, स्थानिक जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात २८ नाेव्हेंबरनंतर आलेल्या १२ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती मिळाली  आहे. हे प्रवासी अतिजाेखमीच्या दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅण्डमधून आल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे. 

दक्षिण आफ्रिकासह नेदरलॅण्डमध्ये ओमायक्राॅनचा संसर्ग वाढला आहे. अनेक देश या विषाणुच्या संसर्गाने प्रभावित झाले आहे. भारतात आतापर्यंत आठ रुग्ण आढळले आहेत. या विषाणूच्या संसर्गाचे वेग जास्त असल्याने केंद्र व राज्य सरकारने स्थानिक जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. 

जिल्ह्यात २८ नाेव्हेंबरनंतर १२ प्रवासी या अतिजाेखमीच्या देशातून प्रवास करून आल्याची माहिती समाेर आली आहे. त्यानुसार या प्रवाशांचा शाेध घेतला जात आहे. त्यात अहमदनगर शहरातील पाच, अकाेले तालुक्यातील चार, काेपरगावमधील दाेन आणि राहाता तालुक्यातील एक प्रवाशाचा समावेश आहे. 

या प्रवाशांचा शाेध घेऊन त्यांची काेराेना चाचणी करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या प्रवाशांची काेराेनाची पहिली चाचणी निगेटीव्ह आली असली, तरी त्यांना पुढील सात दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे. त्यानंतर पुन्हा एकदा काेराेना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित तालुक्यातील स्थानिक प्रशासन या प्रवाशांच्या शाेधासाठी कार्यरत झाले आहेत. 

 जिल्ह्यात १५ प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले हाेते. त्यातील अहमदनगर शहरातील दाेघांचा समावेश हाेता. काेपरगावमधील दाेन, राहाता आणि राहुरीतील तीन, संगमनेरमधील एक आणि श्रीरामपूरमधील चार जणांचा समावेश हाेता. अहमदनगर शहरातील दाेघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. राहुरीतील तिघांची पहिली काेराेना चाचणी निगेटिव्ह आली आहे.


Post a Comment

0 Comments