सिव्हिलच्या अतिदक्षता विभागास आग ; १० जण दगावले
ऐन भाऊबीजेला जिल्ह्यावर शोककळा
वेब टीम नगर : शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगात घटत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागाचे अतिदक्षता विभागात रूपांतर करण्यात आले होते. या अतिदक्षता विभागाला आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास शॉकसर्किटमुळे अचानक आग लागली. त्यामुळे दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून मिळत आहे.
आज जिल्हा रुग्णालयातील नवीन अतिदक्षता विभागाला आग लागली. या विभागाचे फायर ऑडिट झालेले नव्हते. आग व धुराचे लोट दिसल्यावर कर्मचारी व प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. घटना माहिती होताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक घटना स्थळी दाखल झाले. मात्र आग वेगात पसरली. तसेच धुराचे लोटही उठले. अतिदक्षता विभागात अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या 10 रुग्णांचा यात मृत्यू झाला. ऐन भाऊबिजेच्या दिवशीच ही घटना घडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नगर जिल्हा प्रशासनाचे हे प्रयत्न सुरू
घटना स्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अगरवाल, तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकुमार देशमुख आदींनी भेट दिली. रुग्णालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मृतांची नावे -रामकिसन हरगुडे ,सिताराम दगडू जाधव, सत्यभामा शिवाजी घोडेचौरे, कडूबाई गंगाधर खाटीक, शिवाजी सदाशिव पवार, कोंडाबाई मधुकर कदम, आसराबाई गोविंद नागरे, शाबाबी अहमद सय्यद, दीपक विश्वनाथ जडगुळे अशी मृतांची नावे आहेत.
0 Comments