सिव्हिल सर्जन डॉ. पोखरणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर

सिव्हिल सर्जन डॉ. पोखरणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा रुग्नालय आग प्रकरणी निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. रुग्णालयातील आग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान रुग्णालयातील आगप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचारिकांना पोलिसांनी अटक केली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक हे देखील निलंबित असल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता होती. त्यातून त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्या न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली.

डॉ. पोखरणा यांच्यावतीने वकील प्रकाश कोठारी यांनी बाजू मांडली. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर  यांनी जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी आरोग्यमंत्र्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments