संतती प्राप्तीसाठी बलात्कार! महिलेला उज्जैनमध्ये घरात डांबून अत्याचार; जोडप्याला अटक

संतती प्राप्तीसाठी बलात्कार!  महिलेला उज्जैनमध्ये घरात डांबून अत्याचार; जोडप्याला अटक

वेब टीम नागपूर : महाराष्ट्रातील एका २१ वर्षीय महिलेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये घरात बंद करून ठेवल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी या महिलेला केवळ घरात बंदच केलं नाही, तर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून मुलाला जन्म देण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांना एका आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधिकारी सत्येंद्र शुक्ला यांनी सांगितले की, “गुरुवारी मध्य प्रदेशातील एका गावाचा माजी उपसरपंच राजपाल सिंग (३८) याला एका महिलेला १६ महिने बंदिस्त ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आणि तिला मूल जन्माला घालण्यास भाग पाडल्याप्रकरणी अटक केली आहे. ही महिला मुळची नागपूरची रहिवासी आहे. ही महिला देवास गेट बसस्थानकावर आढळल्यानंतर ही बाब उघडकीस आली. आरोपी सिंगने तिला ६ नोव्हेंबर रोजी बेशुद्ध अवस्थेत बस स्थानकावर फेकून दिले होते. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने गुरुवारी पोलिसांना तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली,” असे पोलिसांनी सांगितले.

“आरोपीने पीडितेला एका महिलेच्या मदतीने खरेदी केले होते आणि १६ महिन्यांपूर्वी तिला उज्जैनला आणले होते. त्याने पत्नी चंद्रकांता (२६) सोबत मिळून पीडितेला बंदी बनवून ठेवले होते आणि मुलासाठी तिच्यावर बलात्कार केला होता. या जोडप्याने त्यांची दोन मुले गमावली होती,  त्यामुळे आरोपीने असे कृत्य केले. धक्कादायक म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतर, ६ नोव्हेंबर रोजी सिंगने तिला बसस्थानकात फेकून दिले,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या जोडप्याव्यतिरिक्त पोलिसांनी सिंगचे नातेवाईक वीरेंद्र, कृष्णा पाल आणि एक दलाल म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजपालने पीडितेला नेमके किती रुपयांमध्ये खरेदी केले, याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक नागपूरला पाठवले जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच इतर चार आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments