महिलेची छेड काढली : तिघे अटकेत

महिलेची छेड  काढली :  तिघे अटकेत

 वेब टीम मुंबई: मुंबईतील एका हाय-फाय सोसायटीत दोन वॉचमन आणि अन्य एकाने महिलेची छेड काढून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या ४ महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचा महिलेचा आरोप आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपींकडून बऱ्याच महिन्यांपासून त्रास दिला जात होता. याबाबत तिने आपल्या बॉसलाही सांगितले होते. पीडिता ही आर्टिस्ट असून, ती एका प्रॉडक्शन हाउसमध्ये ऑफिस सेक्रेटरी म्हणून कामही करते.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर या तिनही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती या सोसायटीत गेल्या आठ महिन्यांपासून आपल्या सहकारी महिलांसोबत राहते. जुलै २०२१ पासून तिघे आरोपी तिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करत होते. सोसायटीत प्रवेश करताना किंवा बाहेर जाताना तिच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत बोलले जात होते. २१ ऑक्टोबर रोजी ती सोसायटीत आली असता, एका वॉचमननं तिला अडवले. तसेच सोसायटीच्या रजिस्टरमध्ये नाव नोंदणी करण्यास सांगितले. त्यावर गेल्या आठ महिन्यांपासून या ठिकाणी राहत असल्याचे तिने सांगितले. मात्र, वॉचमनने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यानंतर महिलेने पोलिसांत तिघांविरोधात तक्रार दाखल केली.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात विनयभंग आणि इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोसायटीतील इतर रहिवाशांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. या सोसायटीतील अजून किती महिलांसोबत असा प्रकार घडला आहे, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


Post a Comment

0 Comments