आर्यन खान नशिबवान आहे : ॲड.सतीष मानेशिंदे
वेब टीम मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला त्या स्टेजपर्यंत क्रूझ शिप ड्रग प्रकरणात आर्यन खानच्या बाजूने वकील सतीश मानेशिंदे मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर होते. मानेशिंदे यांनी यापूर्वी संजय दत्त, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौक चक्रवर्ती यांसारख्या सेलिब्रिटींचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी आता आर्यन खान प्रकरणात एक महत्त्वाचं विधान केलं आहे. आर्यन खान नशीबवान आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
बार अँड बेंचच्या मुलाखतीमध्ये मानेशिंदे यांनी खान यांना उच्च न्यायालयानेच कसा दिलासा दिला, हे उघड केले. ज्यांना वकील नेमणं परवडत नाही, असे अनेक लोक कसे तुरुंगात खितपत पडले आहेत, याविषयीही मानेशिंदे यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना मानेशिंदे म्हणाले, “मला असे वाटते की दोन कनिष्ठ न्यायालये त्यांच्या अधिकारक्षेत्राचा वापर करण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. कनिष्ठ न्यायालयांच्या अशा अनास्थेमुळे कायदेशीर व्यवस्थेवर भार पडला आहे आणि उच्च न्यायालयांमध्ये खटले प्रलंबित आहेत. ज्या गोष्टीचे कनिष्ठ न्यायालयाने पहिल्याच दिवशी कौतुक करायला हवे होते पण झाले नाही, त्यामुळे हा त्रिस्तरीय लढा सुरू झाला”.
मानेशिंदे पुढे म्हणाले, “आर्यन खान हे भाग्यवान आहे की त्याच्या वडिलांना त्याच्यासाठी एक कायदेशीर टीम मिळू शकली जी त्याला देशातील सर्वोत्तम वाटली. या देशात हजारो लोक आहेत ज्यांना वकील परवडत नाही, जे अशिक्षित, गरीब आणि उपेक्षित आहेत. आपल्या देशाने आणि न्यायव्यवस्थेने अशा लोकांचा विचार करून हे सुधारले पाहिजे. एखाद्या स्टारच्या मुलाने २५ दिवस त्याच्या विरुद्ध काहीही (कोणतेही पुरावे) नसताना त्रास सहन केला, तुरुंगात काढले तर एखाद्या गरीब माणसाचे काय होईल याची आपण कल्पना करू शकतो”.
बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला २५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. आर्यनच्या जामिनासाठी हायकोर्टाने १४ अटी घातल्या आहेत. आर्यन खान पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडू शकणार नाही, त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामीन आदेशानुसार, त्याला एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जमा करावा लागेल आणि त्याचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे.
0 Comments