किरण गोसावीला पोलीस कोठडी

किरण गोसावीला पोलीस कोठडी 

वेब टीम मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरार आरोपी के पी गोसावीला आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक केलीय. कालच संध्याकाळी के पी गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.आज त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरार आरोपी के पी गोसावीला आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक केलीय. कालच संध्याकाळी के पी गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. कालपर्यंत तो शरण आला नाही. अखेर पुणे पोलिसांनी त्याला अटक केलंय. आज दुपारी त्याला कोर्टात हजर करण्यात आल. 

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांच्या टीम के पी गोसावीला शोधत होत्या. त्याची लूक आऊट नोटिस देखील जारी करण्यात आलेली होती. त्यानुसार पुणे पोलिसांचं पथक त्याचा शोध घेत होतं. अखेर आज सकाळी पुणे पोलिसांनी गोसावीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले.  .

Post a Comment

0 Comments