पाउलबुधे शैक्षणिक संकुलातर्फे पत्रकार विजय मते यांचा सन्मान

पाउलबुधे शैक्षणिक संकुलातर्फे पत्रकार विजय मते यांचा सन्मान

वृत्तपत्र व्यवसायात टिकण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही : डॉ.रेखाराणी खुराणा

  वेब टीम नगर : कोणत्याही क्षेत्रात काम करतांना कष्ट करावेच लागतात. व्यवसायात काही मानसिक श्रमाने तर काही शारीरिक श्रमाने योगदान देत असतात. आजच्या डिजिटल युगात वृत्तपत्र व्यवसायात तर टिकण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पाउलबुधे बी.एड्. महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखाराणी खुराणा यांनी केले.

  डॉ.ना.ज.पाउलबुधे शैक्षणिक संकुलातर्फे वृत्तपत्र विक्रेते  विजय मते यांचा वाढदिवसानिमित्त वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून शाल.श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.खुराणा बोलत होत्या. याप्रसंगी फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण, डीटीएड् च्या प्राचार्या सविता सानप, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे प्राचार्य भरत बिडवे, पॉलिटेक्नीक कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.

 डॉ.खुराणा पुढे म्हणाल्या, आमच्या संस्थेचे संस्थापक माजी आमदार स्व.डॉ.ना.ज.पाउलबुधे यांनी सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून बालवाडी पासून शाळा सुरु केली आज त्याचे वृटवृक्षात रुपांतर झाले आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक, बी.एड्., डीटीएड्, पॉलिटेक्निक, फार्मसी कॉलेजपर्यंत महाविद्यालये सुरु आहेत. तेव्हापासून ते आजपर्यंत आमच्या सर्वच शैक्षणिक संस्थांत वृत्तपत्र  वितरण बरोबरच शैक्षणिक वृत्त देण्याचे काम पत्रकार विजय मते यांनी गेली 35 वर्षे केले आहे. इतका दीर्घकाळ ते या क्षेत्रात टिकून आहेत ही आनंदाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रास्तविकात भरत बिडवे यांनी वृत्तपत्र वितरणाबरोबरच वृत्तसंकलन करुन बातमी देण्याचे काम प्रामाणिकपणे करतात. श्री.मते यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत दिवस काढले आहेत, हे आम्ही अनुभवले. संस्थेला प्रसिद्धी देण्याचे काम त्यांनी केले, पण स्वत: प्रसिद्धी नको म्हणून त्यांनी विनम्रपणे सत्कार नको म्हणाले होते. पण त्यांच्या कष्टाला, प्रामाणिकपणाला, विश्वासाला संस्थेनी दाद द्यावी म्हणून हा छोटासा सन्मान आम्ही केला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, संचालक मंडळ व सर्व स्टाफचे श्री.मते यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments