नगरटूडे संक्षिप्त
अशीही कृतज्ञता !
कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाने केला डॉ. महांडुळे दाम्पत्य व कर्मचाऱ्यांचा सत्कार
वेब टीम नगर : केडगावातील प्रणव हॉस्पिटलची उत्तम सेवा पाहून हॉस्पिटलचा नावलौकिक महाराष्ट्राभर पाेहोचला. अहमदनगर जिल्हाच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातून पेशन्ट अॅडमिट होण्यासाठी येत आहेत. वर्षभरापूर्वी औरंगाबाद येथील रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यावेळी डॉक्टर आिण कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा दिली होती. ते आता ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांनी कृतज्ञता म्हणून डॉ. प्रशांत व डॉ. शारदा महांडुळे आिण कर्मचाऱ्यांचा औरंगाबाद लायन्स क्लबच्या वतीने फ्रंटलाइन वर्कर म्हणून सन्मानपत्र देत सत्कार केला. या अनपेक्षित सत्कारामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत औरंगाबादच्या एका कुटुंबाने हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यातील एक कुटुंब प्रमुख महेश धिमते हे औरंगाबाद लायन्स क्लबचे अध्यक्ष होते. ते व त्यांचे पुर्ण कुटुंब प्रणव हॉस्पिटलमध्ये औषधोपचाराने बरे झाले. त्यांची मुले आपल्या औषधोपचाराने घरीच क्वारंटाइन होऊन बरे झाली. कोरोना काळात डॉ. महांडुळे दाम्पत्य व कर्मचाऱ्यांनी मनापासून नि:स्वार्थ सेवा दिली. ही बाब धिमते यांच्या लक्षात आली. त्यांनी अचानक सोमवारी प्रणव हॉस्पिटलला भेट देत औरंगाबाद लायन्स क्लब तर्फे प्रणव हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा आणि स्टाफ चा सत्कार केला.
कार्यक्रमास औरंगाबाद लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश धिमते, उद्योजक संजीव फळे, मंगेश फिसके, ऋषिकेश धिमते, ओंकार धिमते, योगेश्वर फळे आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निकम टोळीतील ६ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई
वेब टीम नगर : एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या कट रचून दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यातील टोळीप्रमुख सुरेश रणजित निकम, (रा. कात्रड, ता. राहुरी) व त्याच्या टोळीतील पाच जणांविरुद्ध मोक्का कायद्याअन्वये कारवाई करण्यात आली आहे.एमआयडीसी पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला २२ सप्टेंबर रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी मिळाली आहे.
टोळीप्रमुख व टोळीतील सदस्य – सुरेश रणजित निकम (वय २८ वर्ष, रा. कात्रड, ता. राहुरी, करण नवनाथ शेलार (वय १९ वर्षे, रा. विटभटटीजवळ, मोरे चिचोरे, ता. नेवासा),विकास बाळू हनवत (वय २४ वर्षे, रा. पाण्याची टाकीजवळ, कात्रड, ता. राहुरी), सागर शिवाजी जाधव (वय ३० वर्ष, रा. कात्रड, ता. राहुरी), सतिष अरुण बर्डे (वय २८ वर्ष, रा. कात्रड, ता. राहुरी). या टोळीविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याचे दोन,
सोनई पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा एक, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याच्या तयारीत असल्यास भारतीय हत्यार कायदाप्रमाणे, सोनई पोलिस ठाण्यात दरोडा टाकून जीवे मारण्याची धमकी देणे, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोडा व जबरी चोरी, बळजबरीने घरात घुसून चोरी करणे,
या कायद्यानुसार सात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे कट करुन व संगनमताने स्वतःचे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दशहत निर्माण करुन केलेले आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
‘या’ लॉजवर सुरु होता वेश्याव्यवसाय
वेब टीम नगर : शहरातील यशवंत लॉजवर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली आहे. तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी ,सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह पोलीस पथकाने हि कामगिरी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हॉटेल यशवंत मध्ये काही महिलांना देह व्यापार करण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून नगर शहरातील यशवंत लॉज वर छापा टाकून देह विक्री करण्यासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कर्जबाजारीपणाला वैतागून शेतकर्याची आत्महत्या
वेब टीम नगर : पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभळगाव येथील शेतकरी राजू आसाराम घोरपडे याने कर्जबाजारीपणाला कंटाळून घरासमोरील पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राजू घोरपडे यांनी वैजू बाभूळगाव सेवा सोसायटी, विविध बँका व फायनान्सकडून शेती, तसेच व्यवसायासाठी कर्ज घेतले होते.परंतु गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत त्यांना मोठे नुकसान झाले. तसेच व्यवसायालाही फटका बसला. दुसरीकडे बँकांकडून कर्जाचा हप्त्यासाठी तगादे सुरूच होते.
कर्जबाजीपणास कंटाळून घरातील सर्व कुटुंबीय झोपल्यानंतर त्यांनी पडवीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. काही वेळातच घरच्यांच्या लक्षात ही बाबयेताच त्यांनी व शेजाऱ्यांनी घोरपडे यांना तातडीने नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. वैजू बाभूळगाव येथे मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
कोरोना काळात आकारलेले सर्व कर माफ करावेत
वेब टीम कर्जत : कोरोना आणि त्यानंतर सुरु झालेलं लॉकडाऊनची मालिका आजही कायम असून यामुळे मोठी आर्थिक तूट निर्माण झाली आहे. देशासह गावपातळीवर याचे मोठे परिणाम जाणवू लागले आहे.यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यातच नगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीने शहरातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे कोरोना काळात आकारलेले विविध कर माफ करावेत, अशी मागणी शहर भाजपने मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना निवेदन देऊन केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मार्च २०२० पासून सर्वत्र कोरोनाचे संकट आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कर्जत शहरातील व्यवसाय बंद आहेत. यामुळे व्यापारीबांधव आर्थिक संकटात सापडले आहेत. नगर पंचायतीने ज्या व्यापारीबांधवांकडे विविध प्रकारचे कर थकले आहेत,अशांना नोटिसा बजावल्या आहेत. नगर पंचायतीने घेतलेला निर्णय व्यापारीबांधवांसाठी अन्यायकारक आहे. तरी गेल्या दोन वर्षांतील कर माफ करावा,अशी मागणी निवेदनात करण्यात आली. दरम्यान यामागणीवर सकरात्मक निर्णय होणार कि नाही याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
0 Comments