नगरटुडे संक्षिप्त
दरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या
वेब टीम नगर : पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर दरीत उडी मारुन एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
दरम्यान रोहिणी सोमेश्वर कुलकर्णी (वय 57, रा.केडगाव, जि.नगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सौताडा धबधब्याच्या पाण्यात एका महिलेचे प्रेत पर्यटकांना दिसून आले.
सौताडा गावातील युवकांच्या मदतीने हे प्रेत पाण्यातून बाहेर काढले. धबधब्याजवळ एक पर्स, मोबाईल अशा वस्तू सापडल्या.
त्यावरुन या महिलेची ओळख पटविण्यात आली सादर मृत महिलेचे नाव रोहिणी सोमेश्वर कुलकर्णी (वय ५३, रा. केडगाव, ताराबाग कॉलनी) असे आहे.
संबंधित महिलेच्या मोबाईलवरुन तिच्या नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले.दोन महिन्यापूर्वी या महिलेच्या विवाहित मुलीचे अपघाती निधन झाले होते.
मुलीच्या मृत्यूच्या वियोगात रोहिणी होत्या. याच वैफल्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा जबाब महिलेचा मुलगा व नातेवाईकांनी पाटोदा पोलिसांना दिला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यालयात पतीला शिवीगाळ करत फाईली फेकून दिल्या : पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
वेब टीम नगर : पती कार्यालयात काम करत असताना पत्नीने तेथे येऊन पतीला शिवीगाळ करत फाईली फेकून दिल्याची घटना येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात घडली.
याप्रकरणी संबंधित पतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.संबंधीत पती तारकपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात अधिकारी म्हणून काम करतात. सोमवारी ते कार्यालयात काम करत असताना त्यांची पत्नी तेथे आली.व संबंधित अधिकाऱ्यास म्हणाली की , तु तुझ्या पगाराच्या स्लीपा मला दे, असे म्हणून आरडाओरडा करून शिवीगाळ केली. जर पगाराच्या स्लीपा दिल्या नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेल,अशी धमकी देऊन त्यांच्याकडील फाईली हिसकावून घेत फेकून दिल्या. नंतर संबंधित अधिकारी मिटींगसाठी जात असताना त्यांना जाण्यास अटकाव करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
सीएनजी पाईपलाईन खोदकाम करतांना कामगाराचा मृत्यू
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया : घटनेची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा
वेब टीम नगर : कोल्हार खुर्द हायवे रस्त्यावर सी.एन.जी.पाईपलाईनचे खोदकाम करता असतांना एका कामगाराचा मृत्यू झाला. या मृत्यूची चौकशी होवून संबंधित ठेकेदार व सुपरवायझर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटोळे, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, युवा शहराध्यक्ष संदिप वाघमारे, शहराध्यक्ष हरिष आल्हाट, राहुरी तालुका अध्यक्ष प्रदीप मकासरे, उपाध्यक्ष रमेश पळघडमल आदि उपस्थित होते.
जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हार खुर्द येथे नगर- मनमाड रस्त्यावर सी.एम.जी. पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम करतांना नागेश प्रकाश नायक या परप्रांतिय कर्मचार्यांचा मातीच्या ठिगार्याखाली दबून मृत्यू झाला. सदर घटना ही दि.16 सप्टेंबर 2021 रोजी राहुरी तालुक्यात घडली. सदर कामगारास राहाता तालुक्यातील पीएमटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर पी.एम. करुन सदर मृतदेह त्याच्या गावी पाठविण्यात आला.
याबाबत राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. तरी सदर घटनेस जबाबदार असणार्या ठेकेदार व सुपर वायझरवर मनुष्य वधावा गुन्हा दाखल करुन ठेकेदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे. तसेच सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)च्यावतीने राहुरी पोलिस स्टेशन येथे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपअधिक्षक श्रीरामपूर, तहसिलदार राहूरी, पोलिस निरिक्षक राहूरी यांना देण्यात आल्या आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
लालटाकी येथील जागेवर उदयान चे आरक्षण असून देखील अनधिकृत बांधकाम चालू
वेब टीम नगर : अप्पू हती चौक लाल टाकी येथील मुस्लिम मिजगर जमात ट्रस्ट यांचे सर्वे नंबर 6998 वरील जागेमध्ये अनधिकृत बांधकाम व हस्तांतर प्रक्रिया थांबून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनपा उपायुक्त पठारे यांच्याशी चर्चा करताना हाजी निसारभाई बाटलीवाले, आतिक तांबटकर, हाजी आकील खान, आताभाई चांदवडी, हाजी आसिफ काझी आदी उपस्थित होते.
नागोरी मुस्लिम मिजगर जमा ट्रस्ट अहमदनगर च्या संस्थेची लाल टाकी येथे सर्वे नंबर 119 सिटी सर्वे 6998 ही जागा न्यासाच्या मालकीची असून धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अहमदनगर यांचा 11 जानेवारी 2019 रोजी च्या आदेशान्वये 25 जून 2021 रोजीच्या पत्रान्वये सदर न्यायसावर कोणतीही कायदेशीर विश्वस्त मंडळ अस्तित्वात नाही त्यामुळे काही स्वयंघोषित विश्वस्तांनी सदर जागेवर कब्जा करून त्यावर अनधिकृतपणे गाळ्यांचे बांधकाम करून सदर गाळ्यांच्या बदल्यात समाजाच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देणगी स्वीकारून परस्पर विल्हेवाट लावली आहे सदरच्या जागेवर नेहरू स्मारक चे आरक्षण असून सदर जागा ही शासनाने 2005 साली जमीन आरक्षण 88 नुसार उद्याना करिता आरक्षित केलेली आहे व सदरचे आरक्षण हे सन 2008 साली कायम केले आहे. अनेक वेळा मनपा आयुक्तांशी भेटून पत्रव्यवहार करून देखील वारंवार पाठपुरावा करण्यात आला व मनपा आयुक्त यांनी आदेश देऊन देखील झोनल अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने कारवाई करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत उपरोक्त बेकायदेशीर स्वयंघोषित विश्वस्तांनी समाजाची दिशाभूल करून त्याचे बांधकाम करून सदरचे गाळ्यांचे हस्तांतरण प्रक्रिया करत आहे तरी उपरोक्त व्यक्ती विरुद्ध विनापरवानगी जागेवर गाळ्यांचे बांधकाम करून गाळे हस्तांतर करण्याकरिता आर्थिक रक्कम स्वीकारला बाबत तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे व त्या जागेमध्ये उद्यान उभारून चाचा नेहरू यांच्या पुतळ्यासाठी सुशोभीकरण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून येत्या आठ दिवसात कारवाई झाली नाही तर दहाव्या दिवशी आयुक्तांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा बाटलीवाले यांनी दिला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 Comments