अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : अहमदनगर जिल्ह्यातील १९ व्या शतकातील वृत्तपत्राचा इतिहास
'दैनिक समाचार' संस्थापक नरसप्पा आवण्णा यांनी अहमदनगर येथे दैनिक समाचार नावाचे वृत्तपत्र चालू केले होते. त्याचा काळ साधारणतः: सन १८८१ असा असू शकतो. पेपर सुरू केला परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही हा भाग वेगळा. पुढे ते नगर हुन सोलापूर येथे स्थायिक झाले . तेथे त्यांनी सोलापूर समाचार नावाचे वृत्तपत्र चालू केले होते. ते आजतागायत चालू आहे. हे वृत्तपत्र त्यांनी ३ फेब्रुवारी१८८५ रोजी सुरु केले. त्यांचा स्वतःचा छापखाना होता व त्यांना फोटो काढण्याची खूप आवड होती. त्यानंतर खूप मोठ्या अवधीनंतर सन १९५२ मध्ये मोठ्या खटपटीने वसंतराव काणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे दोन भाऊ गो.स.काणे व ज सं काणे यांनी दैनिक 'समाचार, हे वृत्तपत्र सुरु केले व संपूर्ण जिल्हाभर पोहोचवण्याची व्यवस्था लावली.
सन १९११ साली 'शेतकरी' नावाचे पत्र चितळे यांनी नगरमध्ये सुरू केले होते. साधारण वीसेक वर्षे पत्र परंपरा खंडित झाली होती. त्यानंतर पारखे, धनेश्वर, हीवरगावकर प्रभृतीनी 'नागरिक' नावाचे ३ सप्टेंबर १९२० साली सुरू केले. मात्र ,ते फार काळ चालले नाही पुढे माणिकचंद किसनदास मुथ्था यांनी 'देशबंधू 'नावाने साप्ताहिक१८ एप्रिल १९२८ रोजी सुरू केले त्याला राष्ट्रीय पक्षाचे पत्र म्हणत , पुढे या पत्राचे संपादकाचे काम कुंदनमल फिरोदिया व काकासाहेब गरुड यांच्याकडे सोपवले गेले. नंतर सत्याग्रहाच्या आंदोलनात हे पत्र बंद पडले. लोकमान्य मंडळाचे सभासद शंकरराव चांदोरकर यांचे सन १९३३ मध्ये 'भविष्य दीपक' नावाचे साप्ताहिक नगरमधून निघू लागले. किसान संघटनेचे जनक भास्करराव भुस्कुटे यांनी दिनांक ३०एप्रिल १९३६ मध्ये युगांतर नावाचे साप्ताहिक सुरू केले ,ते साप्ताहिक पाच-सहा वर्षे चांगले चालले त्यात एस.व्ही. देशपांडे, बाबा गोसावी ,डी..बी. कुलकर्णी यांचे लेख छापले जात होते. सन १९४७ साली नगर जिल्हा काँग्रेसने 'संघशक्ती' नावाचे साप्ताहिक चालू केले. त्याचे संपादक म्हणून रावसाहेब पटवर्धन व भाऊसाहेब फिरोदिया आणि पाटील यांनी काम पाहिले पुढे सन १९४२ मध्ये रावसाहेबांना स्थानबद्ध केल्यामुळे हे पत्र बंद पडले.
परंतु सन१९४६ मध्ये बाळासाहेब भारदे ,वसंतराव निसळ व ना. सा. दिकोंडा यांच्या मदतीने संदेश 'संघशक्ती' पत्र परत छापण्यास सुरुवात केली सन १९५७ साली भारदे मंत्री झाल्यामुळे त्या पत्राचे संपादकाचे काम वा.द. कस्तुरे यांच्याकडे आले. काँग्रेसचे ध्येय धोरणांना साथ देणारे काही पत्रकं निघाली, त्यामध्ये द.र. निसळ यांचे संदेश हे स्वतंत्र प्रवृत्तीच्या पत्रक होते . असं १९३९ साली आणखी एक पत्र निघाले त्याचे नाव होते ,किसान ,नंतर 'नवयुग' व सरकारी आश्रयाने सन १९४०मध्ये 'युद्ध समाचार' हे पत्रक निघाले होते. परंतु ते अल्पायुषी ठरले. भाई सत्ता यांनी किसान पक्षाच्या प्रचारासाठी 'इन्किलाब ' चालवले. नगर जिल्ह्यातील काँग्रेस पुढारी स्वामी सहजानंद भारती यांनी 'जनसेवा; हे साप्ताहिक काँग्रेसचे धोरणाचा प्रसार करण्याकरता काढले. नंतर काणे बंधू यांनी 'ज्वाला' नावाचे साप्ताहिक मोठ्या हिमतीने १९४४ ते १९५२ पर्यंत चालले पुढे वि . ग. कुंटे यांनी सुदर्शन साप्ताहिक सन १९५४ मध्ये सुरू केले.
पुढे वेगवेगळ्या प्रभृतींनी वेगवेगळी अशी वीस ते पंचवीस साप्ताहिके निघाली , त्यांची नावे पुढे देत आहे. 'अंजन' 'चित्रपट' 'नवप्रमोद, 'विक्रेता', 'विजय' ,'ग्रा मराज्य','व्यापार', 'संग्राम', 'क्रांती' ,'लोकशाही','संघयुग',' विशाल महाराष्ट्र',' यशवंत','नव संदेश','लोकयुग ', अश्मसार', 'सहकारी परिसर',' जनसत्ता',' आझा द हिंद' हे साप्ताहिक स्वातंत्र्यसैनिक राम निसळ यांनी १० मे १९४७ रोजी सुरू केले. सन १९६५साली पी. जे. मुनोत यांनी' नगर टाईम्स' दैनिक रूपाने सुरू केले. त्याचे संपादन आपटे यांनी केले होते. चंदनमल गुंदेचा यांनी'नवा मराठा ' हे साप्ताहिक स्वरूपात चालू केले. त्यांच्या चटकदार भाषा शैली मुले ते विशेष प्रसिद्ध झाले व सध्या दैनिक स्वरूपात चालू आहे. तसेच श्रीरामपूर मधून प्रसिद्ध होणारे श्री वसंतराव देशमुख यांचे 'सार्वमत' हा अंक आजमितीस चालू आहे.
लेखक : नारायणराव आव्हाड
९२७३८५८४५७
संदर्भ : मराठी वृत्तपत्राचा इतिहास
रा. के. लेले . चतुर्थ आवृत्ती , २०२०
वस्तुसंग्रहालय लायब्ररी, अहमदनगर
0 Comments