तिन खंडणीखोर पोलिसांच्या जाळ्यात
वेब टीम श्रीरामपूर : श्रीरामपूरातील हुसेन दादा भाई शेख याने १९जुलै रोजी राहता विभागातील संजय मोहन सिंग बेडवाल यांना फोन करून तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत वकिलामार्फत हायकोर्टात जाणार आहे . तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत मला सर्व माहिती असून पंचवीस लाखांची खंडणी मागितली ,तडजोडी अंती १२ लाख रुपये ठरविण्यात आले ती दिले नाही तर हात-पाय तोडून जिवंत ठार मारण्याची धमकी दिली . २० जुलै रोजी दोन लाख रुपये खंडणी घेऊन ये असे धमकावले याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील अप्पर अधीक्षक दिपाली काळे उप विभागीय अधिकारी संजय सातव यांना दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले ठरल्याप्रमाणे लोणी पोलीस स्टेशनचे पथक वनरक्षक बीड बांधव व दोन पंच तसेच खासगी वाहनाने लोणी होऊन श्रीरामपूरातील वार्ड नंबर १ साई व्हिला रूम नंबर ३३मध्ये राहणाऱ्या हुसेन दादा भाई शेख यांच्या घरी आले . पोलिस बेडवाल यांना मागणीप्रमाणे सापळयातील रक्कम १ लाख २० हजार रुपयांची देऊन घरात पाठवले ते उपस्थित असलेले अनिल गोपीनाथ आढाव (रा. बिरोबा लवन रोड लोणी खुर्द तालुका राहता) सलीम बाबा मीया सय्यद रा. (माळहिवरा गेवराई )यांनी ती रक्कम स्वीकारली आपल्यातील नियोजनाप्रमाणे त्यांना रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपये पंचांसमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात येऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील पोलीस नाईक संपत जायभाये दीपक रोकडे पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र इंगळे सोमनाथ वडणे महिला पोलीस नाईक सविता भांगरे यांनी या तिघांना जेरबंद केले. वनरक्षक बेडवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments