आठ महिन्यांच्या चिमुकलीला तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये झोपवून आई पसार

आठ महिन्यांच्या चिमुकलीला तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये झोपवून आई पसार

वेब टीम पिंपरीः बस तिकीट बुकिंगच्या ऑफिस मध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला झोपवून आई निघून गेली. हा प्रकार गुरुवारी आळंदी गावातील चाकण चौकात असलेल्या खुशाल ट्रॅव्हल्सच्या तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये घडला.

या प्रकरणी शनिवारी (१७ जूलै) एका महिलेने आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आळंदीमधील चाकण चौकात खुशाल ट्रॅव्हल्स या कंपनीचे तिकीट बुकिंग ऑफिस आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता एक अनोळखी महिला तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये आली. तिच्यासोबत सात ते आठ महिन्याचे स्त्री जातीचे बालक होते. त्या बाळाला तिकीट बुकिंग ऑफिसमध्ये झोपवून ती महिला बाथरूमला जाऊन येते, असे सांगून निघून गेली. ती परत आलीच नाही. याबाबत महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments