कलेतून लोकशिक्षण देणारे अण्णाभाऊ साठे समाजसुधारक : माऊली मामा गायकवाड

 कलेतून लोकशिक्षण देणारे अण्णाभाऊ साठे समाजसुधारक : माऊली मामा गायकवाड

नगर वेब टीम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे फकिरा कादंबरी' माझी मैना गावाकडे राहिली लावणी यासह कथा लघुकथा वगनाट्य चित्रपट कथा असे साहित्य अजरामर असून 'जग बदल घालुनी घाव सांगून गेले सांगून गेले मज भीमराव' हे त्यांचे प्रख्यात वाक्य आंबेडकरी चळवळ या चळवळीचे महत्त्व सांगणारे आहे यातून लोक शिक्षण देणारे अण्णाभाऊ समाजसुधारक होते असे गौरवोद्गार ओबीसी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली मामा गायकवाड यांनी काढले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती प्रित्यर्थ येथील सिद्धार्थ नगर चौकातील अण्णाभाऊ यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर महासंघाचे संपर्क कार्यालयात अभिवादन सभा घेण्यात आली.  यावेळी अध्यक्ष स्थानावरून श्री गायकवाड बोलत होते.  यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष अनिल हिवळे महिलाध्यक्षा अनुरिता झगडे किंवा अध्यक्ष आर्यन गिरमे शहराध्यक्ष शाम भाऊ आवटी तालुकाध्यक्ष अमोल घोडके संदीप सोनवणे राजेंद्र घोरपडे सौ वनिता बिडवे सौ छाया नवले आदी उपस्थित होते. 

ते पुढे म्हणाले अण्णा भाऊ हे सामान्य कुटुंबातील होते मात्र त्यांनी साहित्य निर्मिती करून देशातील असामान्य असं नाव मिळवलं, त्यांनी समाजाचं  केवळ मनोरंजनच केलं असं नाही, तर कलेतून लोक शिक्षण दिलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यांच्या पोवाड्याने उभा महाराष्ट्र जागृत केला होता.  त्यांचे साहित्य आजच्या पिढीला हे मार्गदर्शक असेच आहे

Post a Comment

0 Comments