कोरोनाच्या पार्श्व-भूमीवर निमगाव वाघाचा या वर्षीही पायी दिंडी सोहळा रद्द
ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजर करुन
डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम: गावातच पादुका पूजन करुन वृक्षरोपण
वेब टीम नगर : कोरोना महामारीच्या पार्श्व भूमीवर नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील श्री नवनाथ पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला असून, शनिवारी (दि.10 जुलै) प्रस्थानच्या दिवशी गावातच नवनाथांच्या पादुकांचे विधीवत पूजा करण्यात आली. तर स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वारकर्यां च्या उपस्थितीत ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत व टाळ मृदंगाच्या गजरात वृक्षरोपण करण्यात आले.
गावातील नवनाथ मंदिराच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी विणेकरी सुनिल जाधव, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, भाऊसाहेब ठाणगे, भागचंद जाधव, पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष एकनाथ डोंगरे, लक्ष्मण चौरे, पै.अनिल डोंगरे, सदाशिव बोडखे, साहेबराव बोडखे, चंदू जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, बन्सी जाधव, पोपट भगत, अशोक फलके, बाळू बोडखे, गोरख गायकवाड, द्वारका येणारे, श्रृती जाधव, हौसाबाई सोनवणे, तुकाराम पवार, ज्ञानेश्वैर जाधव, सुमित जाधव, बन्सी केदार, कोंडीभाऊ फलके, छगन भगत, सचिन कापसे, मारुती जाधव, दत्ता फलके, विजय जाधव आदिंसह वारकरी उपस्थित होते.
ब्रम्हनिष्ठ विठ्ठल महाराज देशमुख व महामंडलेश्वतर काशीनाथ पाटील यांच्या आर्शिवादाने ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर, ह.भ.प. जयसिंग महाराज मडके, ह.भ.प. संतोष महाराज कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गावातून या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. मात्र कोरोना महामारीमुळे मागील व याही वर्षी पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला असून, दिंडी प्रस्थानच्या दिवशी गावात पादुका पूजन व वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, शहरीकरण व औद्योगिकरणाने मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. प्रत्येक वारकरी हा शेतकरी असून, पर्यावरणाचे समतोल बिघडल्याने शेतकर्यांना नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या दुसर्या, लाटेत ऑक्सिजनचे महत्त्व पटून ऑक्सिजन देणार्याक झाडांची गरज लक्षात आली. वृक्षरोपणाने पर्यावरणाचे प्रश्नस सुटणार असून, निसर्गरुपी विठ्ठलाची भक्ती वारकरी करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित प्रत्येक वारकर्यानने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला. (फोटो-आर एस डब्ल्यू -४०२८)
0 Comments