२५ लाख रोकड, ७४ तोळे सोनं घेऊन मुलगी प्रियकरासोबत पळाली
बळजबरी धर्मान्तर केल्याचा मुलीचा व्हाट्सॲप वर मेसेज
वेब टीम नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील कापड व्यावसायिक व्यापाऱ्याच्या मुलीने प्रियकरासोबत मिळून बापालाच ७२ लाखाचा चुना लावल्याची घटना घडली आहे .कापड व्यावसायिक संजीवकुमार काशीनाथ आप्पा आचारे यांच्या मुलीला त्यांचे बटाई शेत करणाऱ्या इर्शाद मोइनोद्दीन अत्तार या २५ वर्षीय शेतकऱ्याच्या मुलाने फूस लावून पैसे, दागिन्यासहित पळविल्याची तक्रार न्यायालयाच्या आदेशाने मरखेल पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
बटाईदार असणाऱ्या मोइनोद्दीन अत्तार यांच्या मुलाने मुलीशी जवळीकता व मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून तिच्या वडिलांच्या घरी धाडसी चोरी करून पलायन केल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. यात मुलीच्या प्रियकराने परंपरागत ७४तोळयाचे दागदागिने, सोने ,नगद २५लाख रुपयांसह पोबारा केला आहे. मुलीला पळवुन नेण्याची तक्रार देण्यास गेलेल्या वडिलांचा मरखेल पोलिसांनी व्हिडिओ जबाब घेऊन आठ दिवस तक्रार घेतली नाही. त्यानंतर न्यायालयात दाद मागून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रकमेसह पलायन केलेल्या प्रियकराने हैदराबाद येथे मुलीचे धर्मांतर केले असल्याचा वफ्फ बोर्डाच्या नकलांचा पुरावा मुलीच्या पालकांनी दिला आहे.तर वफ्फ बोर्डात धर्मांतर करून निकाह केल्याचे फोटो व कागदपत्र व्हाट्सअॅपच्या माध्यमातून मुलाने मुलीच्या नातेवाईकांना पाठवलेत.
तर आज सकाळी मुलीने आपणास जबरदस्ती धर्मांतर केले गेले असल्याचे मेसेज पालकांना पाठवलेत. त्याचप्रमाणे मला एका रूममध्ये बंद करून बळजबरी बुरखा घालून व्हिडीओ बनवला गेल्याचे मेसजही मुलीकडून पाठवण्यात आले आहेत. दहावीत त 91 टक्के गुण घेणाऱ्या शिक्षणातही अग्रणी असलेल्या मुलीने असे पाऊल उचलल्यामुळे आई वडिलांचा जीव कासावीस होतोय .तर काल रात्री मुलाकडील लोकांनी मुलीच्या वडिलांना जबर मारहाण केली आहे. या घटनेमुळे हणेगाव येथे तणाव पूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु याविषयी काहीही बोलण्यास हणेगाव पोलिसांनी मात्र नकार दिला आहे.
0 Comments