पेट्रोल परवडत नाही तर सायकल वापरा : प्रद्युमन तोमर
वेब टीम नवी दिल्ली : भाजी आणायला मंडईत जाताना सायकल वापरा, इंधनाच्या दरवाढीमुळे सामान्य माणसांना अजिबात फटका बसणार नाही. उलट वाढीव किमतीतून जो पैसा उपलब्ध होईल, तो गरिबांना मोफत अन्नधान्य देण्यासाठीच खर्च होईल, अशी वक्तव्ये सध्या विविध राज्यांतील भाजप नेते करत आहेत.
काही राज्यांमध्ये पेट्रोलचे भाव प्रतिलीटर १०० रुपयांवर गेले किंवा त्याच्या जवळपास आहेत. पण, त्याबद्दल नाराजीचा एकही शब्द भाजप नेते काढताना दिसत नाहीत.उलट नागरिकांचा तुम्ही सायकल वापरा, इंधनाच्या दरवाढीमुळे सामान्य माणसांना अजिबात फटका बसणार नाही अशी शिकवण देत आहे.
मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्नसिंग तोमर यांनी लोकांना असा अजब सल्ला दिला की, मंडईत भाजी आणायला जाताना सायकल वापरा. त्याने प्रकृतीही उत्तम राहील व प्रदूषणही होणार नाही. तेल दरवाढीतून जो पैसा मिळणार आहे, त्यातून गरीब लोकांना दिवाळीपर्यंत मोफत अन्य धान्य देण्यात येणार आहे. असे वादग्रस्त विधान सध्या भाजपाचे नेते करत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दरांनुसार देशात इंधन तेलाच्या दरात चढउतार होतात. तेलाच्या किमती वाढल्या तरी त्यातून मिळणारे पैसे कोणीही घरी घेऊन जात नाही, असे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले होते.
0 Comments