शिवसेनेचा महापौर तर उपमहापौर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होणार ?

शिवसेनेचा महापौर तर उपमहापौर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होणार ? 

वेब टीम  नगर : मनपाच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी संजय शेडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .यावेळी आमदार संग्राम जगताप ,संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर ,जिल्हापमुख प्रा शशिकांत गाडे ,आदींसह सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते . 

मनपामध्ये शिवसेनेचे सर्वाधिक संख्याबळ असून त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस,आणि मग भाजपा आणि कॉंग्रेस यांचे संख्याबळ आहे. मात्र यंदा आघाडीचा धर्म पाळून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ची युती झाल्याने आता जवळपास महापौर पदातील चुरस संपल्यात जमा आहे. त्यामुळे यंदा महापौर शिवसेनेचा आणि उपमहापौर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

त्या अनुषंगाने आज शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . दि.३० रोजी ऑन लाईन पद्धतीने महापौर  पदासाठी मतदान होणार आहे.



Post a Comment

0 Comments