नितीन भुतारे यांच्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार

नितीन भुतारे यांच्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार  

नातेवाईकांनी मानले आभार  

वेब टीम नगर :  तारकपूर रोडवरील हॉस्पिटल मधला प्रकार अहमदनगर शहरात आज एक ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सदस्याचा कोरोना मुळे मृत्यु झाला.  घराची परिस्थीती हलाखीची असल्यामुळे सगळे पैसे संपले होते. शेवटला मृतदेह हॉस्पिटल कडून ताब्यात घेण्यासाठी सुध्दा पैसे राहीले नसल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हॉस्पिटल मधून मृतदेह बाहेर काढावा लागेल परंतु पैसे संपल्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. 

त्यामुळे त्यांना मनसेच्या नितीन भुतारे यांना संपर्क साधा असे काहींनी सांगितल्यानंतर त्यांनी लगेच नितीन भुतारे यांना फोन लावला व त्यांच्याच फोन वर नितीन भुतारे यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी डॉक्टरांशी संवाद साधला सर्व परिस्थिती सांगितल्या नंतर बाकीचे बील हॉस्पिटल ने माफ करुन   मृतदेह ताबडतोब नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रुग्णांच्या नातेवाइकांनी  मदत केल्यामुळे त्यांनी नितीन भुतारे यांचे आभार मानले.


Post a Comment

0 Comments