भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

 भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

वेब टीम मुंबई : मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली आहे. राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्तेत तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजपा जनता युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे.

“भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनमध्ये जमले होते. भाजपाचे काही कार्यकर्ते दगडफेक करणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. यामुळे शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली,” अशी माहिती स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी  शिवसेना भवनवर कोणी चाल करणार असेल तर प्रतिकार करणार हेच शिवसैनिकांनी माहिती असून तेच केलं आहे असंही त्यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments