बाळ बोठेच्या संपत्तीची उघड चौकशी करा : अॅड.लगड
वेब टीम नगर : रेखा जरे हत्या कांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या कडे असलेल्या अपसंपदेची आयकर खात्याने उघड चौकशी करावी असे स्मरण पत्र जेष्ठ वकील अॅड.सुरेश लगड यांनी आयकर खात्याचे मुख्य आयुक्त यां दिले दिले आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या कांडातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे यास कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे. अश्या परिस्थितीत त्याच्या आर्थिक परिस्थितीत आपल्या अधिपत्याखाली आयकर खात्य मार्फत उघड चौकशी होणे आवश्यक आहे. बाळ बोठे याने सुरवातीच्या काळात प्रेस फोटोग्राफर म्हणून वेगवेगळ्या वर्तमान पत्रात काम केलेले होते. तद्नंतर बातमीदार काम केले. सकाळ या वर्तमान पत्रात सहाय्यक बातमीदार त्यानंतर मुख्य बातमीदार त्यानंतर निवासी संपादक आणि शेवटी कार्यकारी संपादक म्हणून काम केलेले आहे. एक प्रेस फोटोग्राफर म्हणून सुरवात केलेल्या या व्यक्तीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता क्षेत्रात काम केलेळे आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा बाळ झटपट (आर्थिक दृष्ट्या) इतका मोठा झाला कि विचारता सोय नाही. बाळ बोठेची सुरवातीची आर्थिक परिस्थिती व आताची आर्थिक परिस्थिती काय आहे याची सखोल चौकशी आपल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली तर अनेक धक्कादायक बाबी उघड होतील.
त्याचे उत्पन्न व त्याच्या कडे असलेली ज्ञात ,अज्ञात,जंगम मिळकत , कॅश रक्कम याची बारकाईने चौकशी केली तर पत्रकरिता क्षेत्रातील हि व्यक्ती इतक्या झटपट श्रीमंत कशी होऊ शकते? व त्यास भरीव असे उत्पन्नाचे कोणते साधन होते कि एवढी प्रचंड माया गोळा करू शकला? तसेच अनेक संस्थांमध्ये स्लीपिंग पार्टनर, पुण्याच्या काही हॉस्पिटल मध्ये पार्टनर, सावेडीत १५ एकर क्षेत्र, भीस्तबाग अहमदनगर मध्ये ७ एकरचा मोठा प्लॉट, भिंगर येथे ५ एकरची जागा अशी ज्ञात संपत्ती असल्याचे समजते याव्यतिरिक्त काही अज्ञात संपती असेल त्याची संपूर्ण चौकशी आयकर खात्याने करणे आवश्यक आहे. पोलिसांनी त्याच्या विविध बँका व संस्थेवर आर्थिक टाच आणलेली असतांना फरार काळात दररोज जे पैसे खर्च होत होते? त्याचीहि बेहिशोबी मालमत्तेची जनहितार्थ चौकशी झाली पाहिजे कारण ३ महिने हि व्यक्ती फरार कशी राहू शकते? फरार काळात या व्यक्तीने जो खर्च केला तो कुठून आला? त्याचा मार्ग काय असे अनेक प्रश्न अॅड.सुरेश लगड यांनी या स्मरणपत्रात उपस्थित केले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रात अनेक पत्रकारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केलेले आहे. त्यातील काही पत्रकारांनी घरासाठी कर्ज घेतले त्या कर्जाचे हफ्ते निट नेटके भरलेले नाहीत आणि या बाळ बोठे याने कशाच्या जीवावर एवढी माया मिळवली याची चौकशी होणे गरजेचे आहे. बाळ बोठे याचा पत्रकारितेतील प्रवास,त्याला तिथे मिळत असलेले उत्पन्न आणि त्याच्याकडे सध्या असलेली संपत्ती, बेहिशोबी मालमत्ता याचा तुलनात्मक अभ्यास करून त्याची बेहीशोबी मालमत्ता जप्त करावी तसेच अनेक संस्थांमध्ये तो छुपा भागीदार असल्याचे समजते त्याबाबत जनहितार्थ चौकशी करावी असे या पत्रात म्हंटले आहे.
0 Comments