अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : अहमदनगर जिल्ह्यातील मराठी वृत्तपत्राचा इतिहास
मुंबईमध्ये ज्ञान प्रसारासाठी बाळशास्त्री जांभेकर व भाऊ महाजन यांनी दर्पण व प्रभाकर नावाचे वृत्तपत्र नावाची वृत्तपत्रे काढली. जनसामान्याना नव्या ज्ञानाची व विद्येची मराठी मध्ये माहिती व्हावी म्हणून मराठी वृत्तपत्र जन्माला आले. यावेळेला मुंबईमध्ये 'दर्पण' आणि 'प्रभाकर' ही वृत्तपत्र सुरू झाली. त्याच वेळेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये 'ज्ञानोदय, नावाचा अंक मिशनऱ्यांनी चालू केला. या पत्राचा मूळ हेतू काहीही असला तरी या अंकाचे मुख्य कार्य म्हणजे धर्माचा प्रसार करणे हे होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. धर्मप्रसारक ख्रिस्ती बांधवांनी मुंबईमध्ये सन १८१३ मध्ये अमेरिकन मराठी मिशन ची स्थापना केली.
महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, अहमदनगर येथे धर्मप्रसार करण्यासाठी ज्ञानोदय या अंकाचा जन्म झाला. असावा अमेरिकन मराठी मिशन यांनी हा अंक मुंबई व पुण्यात ऐवजी अहमदनगर येथे पहिला अंक सुरू केला. हे या अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सन १८४२ वेगवेगळ्या स्वरूपात व वेळोवेळी प्रसिद्ध होत होते ते कधी बंद पडले नाही. 'ज्ञानोदय' चे अंक पहिल्यापासून काही अपवाद वगळता आजही अहमदनगर कॉलेज संग्रहालय विभागात आपल्याला अभ्यासासाठी मिळतात. 'ज्ञानोदय' हा अंक सुरुवातीला दरमहा छापण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे सन १८४२ जून महिन्यात अहमदनगर मधून प्रसिद्ध करण्यात आला हा अंक दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येत होता असे नारायण आव्हाड यांनी सांगितले
हा अंक रेव्हरंड यांच्या देखरेखीखाली शिळा (दगड) छापखा छापत असत त्या अंकावर अमेरिकन मिशन शिळा छाप अहमदनगर १८४२ दामा गुजराती छापणारा असे लिहिले जात होते, आणि तो अंक तयार करीत होते. पुढे जुलै महिन्यात छापखाना व्यवस्थित चालला नाही त्यामुळे दुसरा अंक ऑगस्ट महिन्यात सोळा पाणी काढावा लागला. कसेबसे तीन-चार महिने चालल्यानंतर हा अंक मुंबई येथे मिशन छापखान्यात छापला जाऊ लागला.
सन १८४५ मध्ये या अंकाचे रूपांतर पाक्षिक यामध्ये करण्यात आले. जनतेला पाक्षिक झाल्याची माहिती समजण्यासाठी तारीख एक महिना जानेवारी सन १८४५ च्या अंकात मागे ज्ञानोदय दरमहा एक वेळ आम्ही छापत आलो. या पुढे आम्ही दरमहा दोन वेळा छापत जाऊ असा उल्लेख आढळतो. 'ज्ञानोदय' सुरुवातीला अहमदनगर येथे सुरू केला व नंतर मुंबईत नंतर पुन्हा अहमदनगर येथे अशी मुंबई अहमदनगर या अंकाची स्थलांतरे झाली 'ज्ञानोदय' चे पहिले सहा अंक मराठीत निघाले पुढे इंग्लिश मध्ये लेख छापले जात होते. जुलै १८७३ पासून बारा पाणी साप्ताहिका मध्ये रुपांतर केले गेले. अहमदनगर मध्ये 'वृत्तवैभव' नावाचे वृत्तपत्रही त्या काळामध्ये चालू होते.
सन १८६६ मध्ये दाजीसाहेब कुकडे यांचे 'न्यायसिंधू'नावाचे वृत्तपत्र चालू झाले. दाजीसाहेब स्वतः थोडे लिहित परंतु इतर माणसांनी लिहिलेले स्वतः तपासल्याशिवाय छापित नसत 'बोनापार्ट' या टोपण नावाने एक प्राथमिक शिक्षक खूप वर्षे 'न्यायसिंधू' च लिखाण करीत होते. ' न्यायसिंधू' च्या अंकाला 'जगदादर्श' हा अंक प्रतिस्पर्धी होता. दोन्ही अंक म्हणजे एक ज्येष्ठबंधू व दुसरा कनिष्ठबंधू असे एकमेकाला संबोधित होते. 'जगदादर्श' हा अंक काशिनाथ पंत लिमये चालवत होते. नगरकरांना इशारा म्हणून एक बातमी छापली होती. त्याचा मजकूर असा होता की,' काही लांडगे निराश्रित पण चांगल्या मांसल अशाप्रकारे शेळ्या-मेंढ्या वर पाळत ठेवून त्याजवर छापे मारून अचानक उचलून नेऊन आपल्या जाळ्यात अडकतात शेळ्या मेंढ्या पाळणाऱ्यांना सावध राहावे'. ही बातमी एका अधिकाऱ्यास उद्देशून होती आणि तिचा निशाणा बरोबर साधला गेला.
लेखक : नारायण आव्हाड ,मोबाईल ९८८१९६३६०३
संदर्भ : अध्यक्षीय भाषण, मराठी पत्रकार परिषद ,अधिवेशन नववे
संदर्भ मराठी वृत्तपत्राचा इतिहास
पान नंबर १८०, १८१ दुसरी आवृत्ती २०२०
0 Comments