निमगाव वाघा येथील वृक्षारोपणाची सोलापूरच्या तांदुळवाडी ग्रामस्थांकडून पहाणी
तांदुळवाडीतलोकसहभागातून वृक्षरोपण अभियान राबविण्याचा संकल्प
वेब टीम नगर : निमगाव वाघा (ता. नगर) येथे डोंगररांगा व रस्ते हिरवाईने फुलविण्यासाठी सामाजिक वनीकरण, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या वृक्षरोपण व संवर्धन उपक्रमाची सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील ग्रामस्थांनी पहाणी केली.
तांदुळवाडीच्या ग्रामस्थांना वनरक्षक अधिकारी अफ्सर पठाण व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी वृक्षरोपण व संवर्धनाची माहिती दिली. यावेळी तांदुळवाडीचे उपसरपंच शशिकांत कदम, अॅड. एन.आर. काकडे, नागेश काकडे, सुरेश देठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वनरक्षक अधिकारी पठाण यांनी सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून मागील वर्षी देखील गावातील निमगाव वाघा ते चास रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली होती. या वर्षी निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा (कल्याण रोड) ३ कि.मी. च्या रस्त्याच्या दुतर्फा दीड हजार झाडे लावली जात आहे. वृक्ष जगवून हे अभियान यशस्वी केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायत सदस्य डोंगरे यांनी कोरोनाच्या संकटकाळात सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व समजले असून, सर्वांनी ऑक्सिजन देणारी झाडे मोठ्या प्रमाणात लावण्याची गरज आवश्यकता निर्माण झाली आहे. तर पर्यावरणसंबंधी जागृती होत असताना पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. तांदुळवाडीचे उपसरपंच शशिकांत कदम यांनी निमगाव वाघात उत्तमपणे नियोजन करुन सामाजिक वनीकरण, सामाजिक संस्थांनी वृक्षरोपण व त्याचे संवर्धन केले आहे. या गावाच्या प्रेरणेने व कार्यातून तांदुळवाडी गावात देखील लोकसहभागातून वृक्षरोपण व संवर्धनाची मोहिम राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. (फोटो-आर डब्ल्यू एस -३९५३)
0 Comments