मनातल्या खेळाने घेतला निरागस मुलाचा बळी

मनातल्या खेळाने घेतला निरागस मुलाचा बळी 

वेब टीम नागपूर : तुझ्या दिराचं मुंडकं छाट आणि त्याचा फोटो मला व्हॉट्स ॲप वर टाक नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकीन, असं एका आईला फोन करून धमकावणाऱ्या व्यक्तीने चौदा पंधरा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारून टाकल्याची घटना नागपूरात घडली आहे. सूरज साहू असे आरोपीचे नाव असून राजीव पांडे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

राजू पांडे या निरागस मुलाचे अपहरण करणारा२० वर्षीय सूरज साहू हा आता नागपूर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहे. राजुचा गुन्हा काय? तर तो फक्त मनोज पांडे नावाच्या व्यक्तीचा पुतण्या होता. आरोपी सूरज साहूचा असा समज आणि राग होता की मनोजने त्याच्या आईचे शोषण केले. मनोजशी बदला घेण्याचा कट रचत त्याने राजुला क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले आणि आपल्या बाईकवर बसून जिथे सामना होणार आहे तिथे नेतो असे सांगत घराच्या खूप दूर नेले . 

सूरजने राजुची आई गीता हिला फोन करून दिराचं मुंडकं छाट आणि ते केल्याची पावती म्हणून मला त्याचा फोटो पाठव, नाहीतर तुझा मुलगा माझ्याकडे आहे त्याला मारून टाकीन अशी धमकी दिली. राजुच्या परिवाराने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मैदानात पडलेल्या दगडांनी राजुला सूरजने मारून टाकले. तसेच सर्जिकल साहित्याचा वापर कारून राजुच्या हाताच्या नसाही कापल्या होत्या. त्यात सूत्रांच्या माहितीनुसार समोर येते आहे की जरी सुरजला असे वाटतं आहे की आईचे शोषण राजुच्या काकाने केले तरी त्याच्या आईने असे काहीही नसल्याचं सांगितले आहे. त्यामुळे एका निरागस मुलाचा अंत झाला आणि कारण हा फक्त डोक्यातला खेळ. 

Post a Comment

0 Comments