पायी 'वारी' साठी वारकरी संप्रदाय आग्रही
पुनर्विचारा साठी सरकारला पुन्हा साकडं
वेब टीम पिंपरी-चिंचवड : राज्य सरकारने एसटीतून पादुका पंढरपूरला पाठविण्याचा निर्णय घेतलाय. पण याचा पुनर्विचार करून त्यांनी पायी वारीलाच परवानगी द्यावी. यासाठी दहा संस्थान सरकारला साकडं घालणार आहे. उद्या या दहा संस्था व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत. यंदाचा आषाढी वारी सोहळा एसटीतूनच पाठविण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केला. पण या निर्णयानंतर वारकरी संप्रदायात असंतोष निर्माण झाला. आता राज्य सरकारने पुनर्विचार करावा यासाठी हे संस्थान आग्रही आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयानंतर नाराज झालेल्या देहू संस्थानच्या विश्वस्तांनी बैठक घेतली. या बैठकीत नेमकं राज्य सरकारला कसं साकडं घालायचं, त्यांनी पुनर्विचार करावा यासाठी कशी मागणी करायची. याचा निर्णय घेतला जाणार आहे. दहाही संस्था त्यांच्या पातळीवर अशा बैठका पार पाडत आहेत आणि उद्या या दहा संस्था व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा करून, त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
वारकऱ्यांची ही नाराजी पाहता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा चर्चेची तयारी दर्शवली आहे. विभागीय आयुक्त सौरव राव या दहा संस्थांशी बैठक घेतील असं ही त्यांनी स्पष्ट केलंय. शासनाच्या या निर्णयाचं वारकरी संप्रदायाने स्वागत केलंय. अशीच पायी वारीला परवानगी दिलं तर वारकरी त्यांचे कायमचे ऋणी राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक पाऊल पुढं टाकलंय. त्यामुळं आता विभागीय आयुक्तांशी या दहा संस्थानांची चर्चा होईल. म्हणूनच अखंड वारकरी संप्रदायाला पुन्हा एकदा पायी वारीची आस लागून राहिली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचे संकट सुरु झाल्याने आषाढी वारी संचारबंदीमध्ये झाली होती. यंदा कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात असताना पालखी सोहळ्याने यंदा पायी सोहळ्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला आहे. याबाबत सर्व प्रकारचे कडक निर्बंध वारकरी संप्रदाय पाळण्यास तयार असल्याचे संप्रदायाकडून सांगण्यात येत असून काही झाले तरी पायी वारीची परंपरा या वर्षी खंडित होऊ देऊ नका अशी संप्रदायाची मागणी आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा बसमधून पालखी सोहळे अणावे लागणार असून यंदा फक्त 10 पालख्यांना 20 बस दिल्या जाणार आहेत. भाविकांची संख्या देखील दुप्पट करीत वारकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला आहे. याशिवाय विसाव्यापाशी होणारे प्रतिकात्मक रिंगण करून दिड किलोमीटर पायी चालत येण्यास निर्बंध घालून परवानगी दिली आहे.
0 Comments