देशात कोरोना रुग्णसंख्येत घट ,मात्र मृत्युदर चिंताजनक
वेब टीम नवी दिल्ली : देशात कोरोनाबांधीत रुग्णसंख्येत मागच्या काही दिवसात घट येताना दिसून येत आहे . देशात आता दोन ते अडीच लाखापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे. मात्र रुग्णसंख्या कमी होत असून सुध्दा कोरोनामुळे मुत्यू होणाऱ्या रुग्णसंख्यात कमी होताना दिसत नाही यामुळे देशावरील चिंतेचं ढग अद्याप कायम आहे . देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पार गेली असून,मागच्या चोवीस तासांत ४ हजार ४५४ कोरोनाबाधित रुग्णांची मुत्यू झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवार दिवसभरातील करोना आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात मागच्या चोवीस तासांत २ लाख २२ हजार ३१५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आकडेवारी घसरत असल्याचं यातून दिसून येत असून, त्यात आणखी एक दिलासा म्हणजे याच कालावधी देशात ३ लाख २ हजार ५४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या २७ लाख २० हजार ७१६ वर आली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ इतकी झाली आहे.
नवीन करोनाबाधितांची संख्या आणि करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासा देणारी असली, तरी देशात दररोज मृत्यू होत असलेल्या रुग्णांची संख्या झोप उडवणारी आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून दररोज ४ हजारांच्या आसपास मृत्यू नोंदवले जात असून, मागच्या चोवीस तासांत चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. ४ हजार ४५४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या ३ लाख ३ हजार ७२० इतकी झाली आहे.
0 Comments